Tarun Bharat

गारुडय़ांकडील साप सोडला जंगलात

प्रतिनिधी/ बेळगाव

गारुडय़ांच्या ताब्यात असणाऱया अस्सल नागसापाला ताब्यात घेऊन त्याला मच्छेच्या जंगलात सोडून वन खात्याने खऱया अर्थाने नागचतुर्थी साजरी केली. शुक्रवारी नागचतुर्थी दिवशी दुसऱया रेल्वे गेटजवळ ही घटना घडली. वन खात्याने ताब्यात घेतलेला साप पाहण्यासाठी या ठिकाणी एकच गर्दी झाली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दरवषी नागचतुर्थी आणि पंचमी दिवशी गारुडी आणि प्रामुख्याने महिला सापाला घेऊन दूध लाह्या मागत गल्लोगल्ली फिरतात. काही महिला या नागांची पूजा करुन त्यांना दूध लाह्या अर्पण करतात. शुक्रवारी सकाळी बुट्टीपत साप घालून घेवून या महिला फिरत होत्या. दुसऱया रेल्वेगेटजवळ त्या आल्यावेळी सापाचा दुरुपयोग होत असल्याचे पाहून काही जणांनी ही बाब वनखात्याला कळविली.

त्वरीत वन खात्याचे अधिकारी विनय गौडर, आर. एस. डोंबर्गी, मल्लिकार्जुन जोठ्ठण्णावर व कार्यकर्ते संतोष दरेकर हे दुसऱया रेल्वेगेटजवळ दाखल झाले आणि त्या महिलांकडील अस्सल नागसाप त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्या सापाला मच्छे येथील जंगलामध्ये मुक्त सोडून देण्यात आले.

नागरिकांनी अशा गारुडय़ांना थारा देवू नये आणि जर त्यांच्याकडे साप आढळल्यास त्वरीत वन खात्याला कळवावे, कोणत्याही प्राणीमात्राला पकडून त्याचा दुरुपयोग करणे, त्याच्या माध्यमातून पैसे मिळविणे हा गुन्हा आहे, असे विनय गौडर यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

खोदाईमुळे हिंदवाडीतील रस्ते बनले चिखलमय

Amit Kulkarni

बायपास रस्त्यामुळे बसणार पुराचा फटका

Amit Kulkarni

मराठी सत्तेसाठी माजी नगरसेवकांचा निर्णय स्वागतार्ह

Amit Kulkarni

53 हजार विद्यार्थ्यांना मिळाले बसपास

Amit Kulkarni

राहुल गांधी आज भुतरामहट्टीत

Amit Kulkarni

लवकरच 24 तास पाणी योजना ; 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर..!

Rohit Salunke
error: Content is protected !!