Tarun Bharat

गार्लिक रस्सम

Advertisements

साहित्य : 8 ते 10 लसूण पाकळय़ा, अर्धा चमचा चिंच, 2 लाल सुक्या मिरच्या, अर्धा चमचा काळीमिरी, 1 चमचा धणे, अर्धा चमचा चणाडाळ, अर्धा चमचा जिरं, 3 ते 4 कढीपत्ता पाने, 1 चमचा तेल, चवीपुरते मीठ, तडक्यासाठीः अर्धा चमचा मोहरी, 5 ते 6 कढीपत्ता पाने, 1 चमचा तूप

कृती : एक ग्लास गरम पाण्यात चिंच दहा मिनिटांसाठी भिजत ठेवावी. नंतर हाताने कुस्करुन कोळ गाळावा. राहिलेला चोथा बाजूला काढावा. गरम तेलात लाल सुकी मिरची, काळीमिरी, धणे आणि चणाडाळ दोन मिनिटे परतवावे. गार झाले की त्यातच जिरं, कढीपत्ता आणि दोन चमचे पाणी मिक्स करून मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवावी. त्याच कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेली लसूण गुलाबी रंगावर परतवावी. पॅनमध्ये चिंचेचे पाणी, अर्धी वाटी पाणी आणि मीठ मिक्स करून उकळी काढावी. मिश्रण थोडे आटले की त्यात लसूण आणि मिरची पेस्ट मिक्स करून दोन मिनिटे गरम करावे. आता तडक्यासाठी गरम तुपात फोडणी करून तयार फोडणी चिंचेच्या मिश्रणावर ओतावी. तयार रस्सम गरम भात आणि पापडसोबत द्या.

Related Stories

दूध भेसळीपासून सावधान

tarunbharat

राईस टिक्की

Omkar B

समतोल आहाराचे महत्त्व

tarunbharat

पनीर कोफ्ता

Omkar B

World Vegetarian Day : ‘या’ ६ शाकाहारी पदार्थात आहेत भरपूर प्रथिने,मांसाहाराला ही टाकतील मागे

Archana Banage

करवंदे खाणे आहे इतके फायदेशीर…

Rahul Gadkar
error: Content is protected !!