Tarun Bharat

गालजीबाग येथे 4.25 लाखांचे अमली पदार्थ जप्त

काणकोणात पोलिसांचा आठवडाभरातील दुसरा छापा

प्रतिनिधी/ काणकोण

अवघ्या महिन्याभरापूर्वी काणकोण पोलीस स्थानकाचा ताबा घेतलेले निरीक्षक प्रवीण गावस यांच्या मार्गदर्शनाखाली काणकोणच्या पोलिसांनी आठवडाभरात दुसऱयांदा अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करताना 5 रोजी पहाटे 3.30 च्या दरम्यान छापा टाकला आणि गालजीबाग चर्चनजीक एका स्थानिक नागरिकाच्या घरात वास्तव्याला असलेल्या मूळ पश्चिम बंगालमधील त्रिदीप तपनकुमार नंदी या 41 वर्षे वयाच्या व्यक्तीकडून 4 लाख 25 हजार रु. किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. त्यात एलसीडी 90 ग्रॅम, चरस 4.47 ग्रॅम आणि 7.74 ग्रॅम इतका गांजा असून एलसीडीसारखा भयानक अमली पदार्थ पहिल्यांदाच काणकोणात सापडला आहे.

निरीक्षक गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तालुक्यातील अमली पदार्थविरोधी मोहीम अशीच चालू राहणार आहे. काणकोण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक स्वदेश देसाई, हवालदार गौतम देसाई, धनंजय देसाई, अक्षय नाईक यांनी मिळालेल्या माहितीनुसार हा छापा टाकला. संशयिताला मुद्देमालासहित अटक करण्यात आली असून यानंतर काणकोणच्या न्यायालयात संशयिताला उभे करून पुढील चौकशीसाठी रिमांड घेण्यात येणार आहे. दक्षिण गोव्याचे अधीक्षक परमजितकुमार सिंग, उपअधीक्षक किरण पडुवाल, निरीक्षक गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज देविदास पुढील तपास करत आहेत.

Related Stories

कोविड बाधितांच्या टक्केवारीत 5.25 वाढ

Amit Kulkarni

शापोरा टी-10 क्रिकेटमध्ये जय गणेश, आर्मस्ट्राँग अंजुणा, ओशन किंग्सचे विजय

Amit Kulkarni

डिचोली तालुक्मयाला जोरदार पावसाने झोडपले

Amit Kulkarni

मांद्रे विकास परिषदेला अनुदान सुरु करा

Amit Kulkarni

डिचोली सम्राट क्लबचा बुधवारी अधिकारग्रहण सोहळा

Amit Kulkarni

सर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घ्या

Amit Kulkarni