Tarun Bharat

गावच्या विकासात मुश्रीफांचे मोलाचे योगदान : बाळासाहेब तुरंबे

साके येथे नाविद मुश्रीफांच्या वाढदिनी आडीच कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

वार्ताहर / व्हनाळी

कागल तालुक्यात सार्वजनिक रस्ते, गटारी, लाईट, पाणी पुरवठा योजना आदी विकासकामे पुर्ण करून गेल्या पंधरा वर्षात तालुका विकासाभीमुख करण्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचे योगदान महत्वपुर्ण आहे. गेल्या पंधरा वर्षात साके गावात सुमारे 5 कोटींची विकास कामे पुर्ण झाली आहेत. सध्या नवीन कामांसाठी आडीच कोटी निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. साके गाव तालुक्यात विकासाचे आदर्शवत गाव म्हणून प्रसिद्ध होणार असून यामध्ये मुश्रीफांचे मोलाचे सहकार्य असल्याचे प्रतिपादन तालुका संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब तुरंबे यांनी केले. साके ता. कागल येथे नाविद मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 2 कोटी 45 लाखाच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य मनोज फराकटे होते.

यावेळी प्राथमिक शाळा ते भैरवनाथ देवालय, साके-व्हनाळी, जाधववाडी आदी रस्ते कामांचा शुभारंभ जि. प. सदस्य मनोज फराकटे, बाळासाहेब तुरंबे, सी.बी.कांबळे, चंद्रकांत निऊंगरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संताजी शुगरचे चेअरमन मा. नाविद मुश्रीफ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

मनोज फराकटे म्हणाले, मंत्री मुश्रीफांच्या प्रयत्नातून अनेक गावांचा विकास पुर्ण झाला आहे. उवर्रीत विकासकामे लवकरच मार्गी लावून कागल तालुका विकासाचा आदर्श तालुका म्हणून जिल्ह्यात ओळख होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून महाविकासआघाडी मार्फत कामे करून घ्यावीत असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमास बापूसो पाटील, मारूती निऊंगरे, अशोक सातुसे, विजय जाधव, यशवंत बाचणकर, दतात्रय ससे, राजू नायकवडी, बाजीराव पाटील, तानाजी हरेल, संताजी शुगर कमर्चारी उपस्थित होते. स्वागत सुरेश मर्दाने यांनी केले तर आभार इंजिनिअर प्रकाश वाडकर यांनी मानले.

Related Stories

‘समाजकल्याण’चे अनुदान दुप्पट

Archana Banage

पूणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला जागीच ठार

Archana Banage

कोल्हापूर : डी.लिट पदवी देवून डॉ. ज्ञानेश्वर मुळेंचा सन्मान व्हावा

Archana Banage

पन्हाळा पुरवठा विभागात भष्ट्राचाराचा ‘अरुणोदय’

Archana Banage

संभाजीराजेंबद्दल शिवसेना-काँग्रेसला विचारावे लागेल- शरद पवार

Rahul Gadkar

कोडोली नळपाणी पुरवठा योजना ताब्यात घेण्यासाठी दबावतंत्र

Archana Banage