Tarun Bharat

गावठाणातील बांधकामांना जिल्हा परिषदेची नियमावली

Advertisements

राज्यात सातारा जिल्हा परिषदेचा पहिला प्रयत्न, : मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या मार्गदर्शक सूचना,

प्रतिनिधी / सातारा

गावठाण हद्दीत घर बांधणं पूर्वी सोपं होते. कोणीही आपल्या जागेत कधीही घर बांधू शकत होतं. परंतु आता शासनाच्या नियमानुसार गावठाण हद्दीत नियमानुसार बांधकाम करावे लागणार आहे. सातारा जिह्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी मंगळवारी जिह्यातील गटविकास अधिकाऱयांकरवी ग्रामपंचायतींना त्याची अंमलबजावणी करण्याबाबत परिपत्रक पाठवले गेले आहे. गावठाण हद्दीतील इमारत बांधकामाकरता ग्रामपंचायतस्तरावर कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक आहे. गावपातळीवर ग्रामपंचायतीकडून बांधकाम परवाना द्यावयाची मार्गदर्शक नियमावली दिली गेली आहे.

सातारा जिह्यातील गावपातळीवर घर बांधण्यासाठी परवाना काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ कशी होईल यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी एक नव्याने परिपत्रक काढले गेले आहे. शासनाचा 24 फेब्रुववारी 2021 च्या निर्णयानुसार प्रत्येक गावात घर बांधण्यासाठी परवानगी आवश्यक होती. मात्र, त्या मार्गदर्शक सूचना किचकट होत्या. त्यामुळे ग्रामसेवक संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे मार्गदर्शन मागवले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दि. 8 रोजी नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार इमारत बांधकामाकरता भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार नियमावली करण्यात आली आहे. 300 मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या भूखंडावरील गाव हद्दीतील इमारत बांधकामाकरता ग्रामपंचायतींकडून तपासणी करायची कागदपत्रे, विकास शुल्क, कामगार उपकर हे ठरवून दिले गेले आहेत. एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली ठरवून दिलेली आहे.

कागदपत्रे तपासणी करणे आवश्यक असून त्यामध्ये इमारत बांधकामाचा प्रस्ताव ग्रामपंचायतीकडे सादर करताना जागेच्या मालकीचे कागदपत्रे म्हणून प्रॉपर्टी कार्ड, सिटी सर्व्हे नकाशा, सिटी सर्व्हे झाला नसल्यास नमूना नं. 8 चा उतारा, चतुसिमेचा नकाशा, चतुसिमेलगतच्या मिळकतधारकांचे संमतीपत्र ही कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. मंजूर लेआऊट आणि बिल्डींग प्लॅन आवश्यक आहे. विकासशुल्क हा ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीत जमा करण्यात येणार आहे. कामगार उपकर संबंधित प्राधिकरणाकडे भरल्याची पावती, आर्कीटेक्टचा दाखला ही कागदपत्रे महत्वाची आहेत.

सुलभ संदर्भासाठी सातारा जिल्हय़ासाठी घोषित बांधकामाचे दर

बांधकामाचे प्रकार        दर प्रती चौ.मी.

  • आर.सी.सी.     16,456
  • इतर पक्के         13,35
  • अर्धे पक्के          9,425
  • कच्चे    6,048

राज्यात सातारा जिह्याने प्रथमच मार्गदर्शक सूचना काढल्या

शासनाने परिपत्रक काढले. परंतु त्यानंतर अतिशय सुटसुटीत अशी मार्गदर्शक नियमावली ग्रामपंचायतींना सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी काढली आहे. त्यानुसार बांधकाम परवानगी काढण्याचे अर्ज ग्रामपंचायतीत मिळणार आहेत. त्यामुळे अतिशय सुलभ प्रक्रिया होणार आहे. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह ग्रामपंचायत विभाग व जिह्यातील ग्रामसेवकांचा मोलाचा वाटा आहे.

Related Stories

चोरी प्रकरणामुळे बँकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Patil_p

चोरीला गेलेले 7 लाखांचे दागिने, 1.80 लाखांची रोकड फिर्यादींना सुपूर्त

datta jadhav

सातारा : भाजपकडून ‘शेतकरी विरोधी पत्रक’ फाडून ठाकरे सरकारचा निषेध

Abhijeet Shinde

अर्जुन यादव खूनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार जेरबंद

Kalyani Amanagi

उदयनराजे यांनी केली कास धरणाच्या कामाची पाहणी

Abhijeet Shinde

कोयना परिसर भूकंपाने हादरला

Patil_p
error: Content is protected !!