Tarun Bharat

गावागावात लोकांचे स्वेच्छेने लॉकडाऊन

Advertisements

सरपंच, पंच, ग्रामस्थांकडून पुढाकार : सर्वांनकडून मिळतोय चांगला प्रतिसाद

प्रतिनिधी / पणजी

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत असून सत्तरी, काणकोण, डिचोली, फोंडा, धारबांदोडा, पेडणे या तालुक्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या रुग्णांमुळे गावागावात लोकांनी स्वेच्छेने लॉकडाऊन सुरु केले आहे. काल बुधवारपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 320 झाली असून 67 रुग्ण त्यातून बरे झाल्याची माहिती मिळाली आहे. काल बुधवारी 28 नवे रुग्ण मिळाले असल्याने संख्या वाढतच चालल्याचे स्पष्ट होत आहे.

वास्को मांगोरहिल येथून सुरू झालेले कोरोना संक्रमण आता संपूर्ण गोव्यातील गावागावात होऊ लागले आहे. हे सर्व चालू असताना राज्यातील सर्व व्यवहार जनजीवनही सुरू असून त्याचा परिणाम होऊन कोरोनाचे रुग्ण आणखी वाढतील असे संकेत मिळत आहेत.

लोकांचे स्वेच्छेने लॉकडाऊन सुरु

या परिस्थितीत खरे म्हणजे लॉकडाऊन करण्याची गरज होती, असे सर्वसाधारण मत जनतेमध्ये दिसून येते, परंतु डॉ. सावंत आणि त्यांचे सरकार लॉकडाऊन करण्यास तयार नाहीत. उलट हॉटेल्स, धार्मिक स्थळे चालू करण्यात आल्यामुळे कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. तसेच रुग्णांची वाढती संख्या तेच दर्शवित असून राज्यातून लॉकडाऊनची मागणी वाढत आहे. परंतु त्या मागणीकडे सरकार फारसे लक्ष देत नसल्याने लोक नाराजी व्यक्त करत आहेत. त्यातून लोकांनी स्वेच्छेने स्वतःच्या गावात लॉकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे हळूहळू अघोषित लॉकडाऊनच संपूर्ण गोव्यात होण्याची शक्यता आहे.

अनेक गावातील पंच, सरपंचांनी दुकाने व इतर आस्थापनांना लॉकडाऊनचे आवाहन सुरू केले असून त्यास दुकानदार, इतर विक्रेते चांगला प्रतिसाद देत आहेत. ज्या गावात कोरोना रुग्ण सापडले तेथे लॉकडाऊन सुरू झाले आहे. सरकार जर लॉकडाऊन करत नसेल तर जनतेनेच आता स्वतःहून पुढे येऊन ते सुरू करावे, अशी मतप्रणाली लोकांमध्ये आढळून येत आहे.

कोविड हॉस्पिटलातही कोरोनाची बाधा

 चिखली येथील आरोग्य केंद्रातील अनेक कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आता मडगावच्या कोविड हॉस्पिटलमधीलही एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने, त्याला त्याच कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले आहे. त्यामुळे तेथील इतर कर्मचारी धास्तावले आहेत. पॉझिटिव्ह असलेल्या कर्मचाऱयाच्या संपर्कात जेवढेजण आले होते, त्यांना आज गुरूवारी कोविड चाचणी घेण्यास सांगण्यात आले आहे.

मास्क न वापरता फिरत होता सर्वत्र

कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला हा कर्मचारी  मास्क न वापरता सर्वत्र फिरत होता. हॉस्पिटलातील इतर कर्मचाऱयांना चहा-नाश्ता, जेवण देण्याचे काम करायचा. मंगळवारी त्याला मास्क न वापरण्याबद्दल विचारणा करण्यात आली. तेव्हा त्याने आपल्या धर्मात मास्क वापरले जात नसल्याचे स्पष्टीकरण डॉक्टरना दिले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मास्क न वापरल्यास डय़ुटीत बदल करून कपडे धुण्याच्या विभागात पाठवितो, असे म्हटल्यावर त्याने मास्क वापरला. मात्र, त्यापूर्वीच त्याला कोरोनाची बाधा झाली होती.

पेडणे तालुक्यातील पहिला रुग्ण पालयेत

पेडणे / प्रतिनिधी

पेडणे तालुक्मयातील कोरोनाचा पहिला रुग्ण पालये येथे सापडला आहे. त्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तुये सामुदायिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. विद्या परब यांनी दिली. हा रुग्ण कदंब महामंडळाच्या मडगाव डेपोमध्ये कंडक्टर आहे. त्याच्या कुटुंबीयांचीही चाचणी केली असून अहवाल अजून आलेला नाही. मांदेचे आमदार दयानंद सोपटे यांनीही पालये येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याच्या माहितीला दुजोरा दिला. ते म्हणाले की, मांदे मतदारसंघातील तसेच पेडणे तालुक्मयातील नागारिकांनी भयभीत होऊ नये. प्रत्येकाने मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर करत आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.

हा कर्मचारी पिकनिकसाठी गेला नव्हता ः मधू परब

कोरोनाबाधीत रुग्णाच्या कुटुंबाला मानसिक आधार देण्याची ही वेळ आहे. ही व्यक्ती लवकरच बरी होऊन परत येणार आहे. हा कर्मचारी जनतेची सेवा बजाविताना बाधित झाला आहे, तो पिकनिकसाठी तेथे गेला नव्हता. हे समजून घेऊन ग्रामस्थांनी सहानभुतीपूर्वक पहावे. संकटातून बाहेर पडण्यासाठी कुटुंबियांना धीर द्यावा, असे आवाहन स्थानिक पंचसदस्य तथा भाजप मंडळ अध्यक्ष मधुकर परब यांनी केले आहे.

धारबांदोडा

कुळे शिगांव पंचायत क्षेत्रात एक कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडला असून दोघा कोरोनाबाधीत रुग्णांचा कुळे-शिगाव भागाशी संपर्क आल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. तिघा रुग्णांपैकी दोघे कदंब कर्मचारी तर एक वीज खात्याचा कर्मचारी आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लॉकडाऊसंबंधी कुळे पंचायतीचा विचार सुरु आहे. 

 बिंबल-कुळे भागात सापडलेला रुग्ण कदंब कर्मचारी असून कामाच्या ठिकाणी त्याला संसर्ग झाल्याची शक्यता आहे. दुसरा कोरोनाबाधीत रुग्ण मूळ सांगे येथील असून शिगांव येथील वीज उपकेंद्रावर तो कामाला आहे. तिसरा रुग्ण मूळ शिगांव येथील असला तरी त्याचे वास्तव्य मडगावात आहे. 5 जून रोजी वटपौर्णिमा साजरी करण्यासाठी तो आपल्या पत्नी व मुलांसह शिगांवला आला होता. तोही कदंब महामंडळाचा कर्मचारी आहे.

 बिंबल कुळे येथे सापडलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांसह त्याच्या संपर्कात आलेल्या 8 जणांचे तर दुसऱया रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 16 लोकांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पिळये आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. संदेश मडकईकर यांनी दिली आहे. आज गुरुवारी हे सर्व चाचणी अहवाल उपलब्ध होणार आहेत. वीज कर्मचारी असलेल्या सांगे येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या  शिगाव वीज केंद्रावरील एकूण 17 जणांचे कोविड नमूने आज गुरुवारी तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

 लॉकडाऊनसंबंधी आज होणार निर्णय  

दरम्यान, खबरदारीचे उपाय म्हणून कुळे बाजारकर मंडळ व व्यापाऱयांशी चर्चा करून कुळे येथील बाजारपेठ व इतर व्यवहार बंद ठेवून लॉकडाऊन संबंधी आज निर्णय होणार असल्याचे सरपंच मनीष लांबोर यांनी सांगितले.

Related Stories

सोनसडय़ावरील समस्या सहा महिन्यांत सोडवा

Patil_p

गावकरवाडा येथे नवा सोमवार उत्सवात नामवंत गायकांच्या मैफली

Amit Kulkarni

आरोपींची खाती गोठविण्याचे आदेश

Patil_p

घरपोच सेवेपेक्षा खरेदी परवाना हा पर्याय योग्य !

Omkar B

इच्छुक, मावळत्या नगरसेवकांकडून मतदारांची कामे करून देण्याचे सत्र

tarunbharat

… तर संपूर्ण गोव्यातील पोलिसस्थानके कमी पडतील

Patil_p
error: Content is protected !!