Tarun Bharat

गावी जाण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच…

पंढरपूरच्या युवकाचा परुळेत मृतदेह लॉकडाऊनमुळे निघाला होता गावी पोलिसांनी पाठविले होते माघारी : आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज

वार्ताहर / परुळे:

चिपीöपरुळे विमानतळ येथे इलेक्ट्रिशियन म्हणून कामाला असलेल्या सचिन ऊर्फ बुवा भालेराव (27) हा युवक याच परिसरातील स्मशानभूमीनजीक मृतावस्थेत आढळला. घटनास्थळावरील स्थितीवरुन त्याने गळफास लावून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, हा युवक लॉकडाऊनमुळे दोन दिवसांपूर्वी चालत आपल्या पंढरपूरला गावी निघाला होता. मात्र, गगनबावडा घाटात त्याला पोलिसांनी अडवून माघारी पाठविले होते.

गेली दोन वर्षे चिपी विमानतळ येथे तो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होता. सचिन हा मूळ पंढरपूर तालुक्मयातील रहिवासी आहे. आज सकाळी कुणालाही न सांगता तो निघून गेला होता. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला. निवती पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारही नोंदविण्यात आली होती. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास परुळे पोलीस पाटील सुभाष घोलेकर यांचा परिवार काजू काढण्यासाठी बागेत गेले असता, त्याठिकाणी मोबाईलची रिंग वाजत होती. त्यावेळी त्यांनी पाहणी केली असता, त्याठिकाणी एक युवक पडलेला आढळला. त्याच्या गळय़ात नायलॉन दोरीचा फास होता. तसेच तेथील झाडालाही नायलॉन दोर तुटलेल्या अवस्थेत लटकत होता. याबाबत पोलीस पाटील यांनी निवती पोलीस ठाण्यात तात्काळ खबर दिली. पोलीस तेथे दाखल झाले आहेत. परुळे स्मशानभूमीनजीक नायलॉन दोरीच्या साहय़ाने गळफास लावून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सचिन याला ‘बुवा’ या टोपणनावाने सर्वत्र ओळखले जायचे. मनमिळावू स्वभाव व लहान मुलांची आवड असल्याने तो सर्वत्र परिचित होता.

Related Stories

रत्नागिरी विमानतळ जागेसाठी एकही हरकत नाही

Patil_p

कुडाळला सभापतींची निवड बिनविरोध

NIKHIL_N

असगणीच्या माळरानावर रेल्वे कारखाना आकार घेतोय!

Patil_p

खाडीभागातील खारफुटी धोक्यात

Patil_p

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

Archana Banage

संगमेश्वर तालुक्यात दुर्मिळ ब्लॅक पँथरचे दर्शन

Patil_p