Tarun Bharat

गिनीमध्ये सैन्याकडून सत्तापालट

अध्यक्षीय प्रासादाकडे कित्येक तास गोळीबार – अध्यक्षीय कोंडे नजरकैदेत

वृत्तसंस्था/ कॉनक्री

पश्चिम आफ्रिकेतील छोटासा देश असलेल्या गिनीमध्ये सैन्याने सत्तापालट करत सत्ता स्वतःच्या हातात घेतली आहे. रविवारी राजधानी कॉनक्रीमध्ये दिवसभर गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यादरम्यान अध्यक्षीय प्रासादानजीक सर्वाधिक गोळीबार झाला आहे. गिनीचे अध्यक्ष अल्फा कोंडे यांना घरात नजरकैद करण्यात आले आहे.

गिनीच्या सैन्याच्या एका कर्नलने स्वतःच सत्तापालटाची माहिती दिली आहे. सैन्याने सरकारला हटविले आहे. सैन्य आता देश सांभाळणार असल्याचे या कर्नलने राष्ट्रीय वाहिनीवरून देशवासीयांना संबोधित करत म्हटले आहे. रविवारी संध्याकाळी उशिरा अध्यक्ष कोंडे यांची काही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. या छायाचित्रांमध्ये कोंडे हे सैनिकांनी घेरले गेल्याचे दिसून येते.

गिनीच्या अन्य देशांना लागून असलेल्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सैन्याने देशातील सर्व विमानतळांनाही बंद केले आहे. 83 वर्षीय अध्यक्ष कोंडे यांनी मागील वर्षी तिसऱयांदा निवडणूक जिंकली होती, पण त्यांची लोकप्रियता सातत्याने कमी होत चालली होती आणि यामुळे देशासमोर संकट निर्माण झाले होते असा दावा कर्नल मामादी यांनी केला आहे.

गिनीची लोकसंख्या सुमारे 1 कोटी 20 लाख आहे. गिनी हा देश 1985 मध्ये फ्रान्सच्या कब्जातून मुक्त झाला होता. त्यानंतर तेथे 2010 मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली होती. कोंडे यांच्यावर यापूर्वी देखील एकदा हल्ला झाला होता.

Related Stories

सापाचा बनविला चाबूक

Patil_p

ब्रिटनचे उपपंतप्रधान राब यांचा राजीनामा

Patil_p

9 शहरांमध्ये संचारबंदी

Patil_p

सोमालियाच्या हॉटेलमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, 9 ठार

Patil_p

18 वर्षांनी संगणकाच्या मदतीने बोलू लागला

Patil_p

अंदमान-निकोबारला धडकले ‘असनी’

Omkar B
error: Content is protected !!