Tarun Bharat

गिरणी कामगारांच्या पाठीशी महाविकास आघाडी – पालकमंत्री

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

गिरणी कामगारांना सरकार म्हणून आम्ही वाऱयावर सोडणार नाही. या कामगरांना अद्यापही शंभर टक्के घरे मिळाली नाहीत. त्यांचा संघर्ष आजही सुरु आहे. गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळण्यासाठी नक्की प्रयत्न करु.याबाबतचा कायदा रद्द होण्यासाठी प्रयत्न करु.मंत्री, खासदार, आमदार मिळून कायदा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे संयुक्त बैठक लावण्यासाठी प्रयत्न करु. गिरणी कामगारांच्या पाठीशी महाविकास आघाडीचे सरकार भक्कमपणे पाठिशी असणार आहे, आशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. ते शासकीय विश्रामधाम येथे श्रमिक संघाने आयोजीत केलेल्या सभेत बोलत होते. गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळावीत, फडणवीस सरकारचा 2019 चा शासन निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने रद्द व्हावेत या मागणीसाठी ही बैठक आयोजन केले होते. संघटनेच्या मागण्यांचे निवेदन मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सतेज पाटील यांनी स्वीकारले.

यावेळी कामगार मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गिरणी कामगारांचा घरांसाठींचा संघर्ष अनेक वर्षांचा आहे. गिरणी कामगारांच्या घामाने,श्रमाने मुंबईचा विकास झाला.गिरणी कामगारांच्या पाठीशी महाविकास आघाडी आहे. पालकमंत्री व मी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करु.फडणवीस सरकारचा याबाबतचा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही करु. ही दिवाळी गोड करण्याचा आम्ही प्रयत्न करु. यावेळी गिरणी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

बैठकीत श्रमिक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी मनोगते व्यक्त केले. यामध्ये कॉ.अतुल दिघे म्हणाले, मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीस सरकारने फ्रॉड केला आहे असे म्हणतात. गिरणी कामगारांची जमीन भांडवलदारांना दिली आहे. फ्रॉड करणाऱयांना आत टाका. आशी मागणी यावेळी कॉ.दिघे यांनी केली.

Related Stories

कोगेतील धोकादायक वळणामुळे अपघात, जीवित हानी टळली

Archana Banage

‘ऑन दी स्पॉट’ लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद

Archana Banage

इचलकरंजीतील शुभम कुडाळकरच्या मारेकऱ्यांना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश

Archana Banage

वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केल्यास पुर्नजोडणी शुल्क नियमानुसारच

Archana Banage

अस्वलवाडीत झाड तोडण्यावरून मारामारीत दोन जखमी

Archana Banage

अनधिकृत बांधकामावर प्राधिकरणाचा हातोडा

Archana Banage
error: Content is protected !!