Tarun Bharat

गिरीश चोडणकर यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

प्रतिनिधी /पणजी

गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला आहे. तो राजीनामा पक्षश्रेष्ठी स्वीकारून त्या पदासाठी नवीन चेहरा निवडण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. त्या पदासाठी आता कार्यकारी अध्यक्ष व आमदार आलेक्स सिक्वेरा, उपाध्यक्ष तथा आमदार संकल्प आमोणकर तसेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची नावे चर्चेत आहेत.

चोडणकर यांनी यापूर्वी दोनवेळा राजीनामा दिला होता. परंतु तो स्वीकारण्यात आला नव्हता तथापि आता मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात येणार असून तेथे नवीन व्यक्तीची नेमणूक होणार असल्याचे सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीपूर्वी चोडणकर यांच्या नेतृत्वावर काँग्रेसच्या नेत्यांनीच अनेक आरोप केले होते आणि त्यांना हटवण्याची मागणी केली होती. त्यांच्यामुळेच काँग्रेसचे आमदार फुटले, असाही आरोप झाला होता. परंतु त्यांना हटवण्यात आले नाही उलट विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांना कायम ठेवण्यात आले आता मात्र त्यांना हटवण्यात येणार असल्याचे पक्षीय सूत्रांनी सांगितले.

चोडणकर यांनी आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला असून काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी त्यास दुजोरा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीतील गोव्यात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊन राजीनामा देत असल्याचे चोडणकर यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, सदर पदासाठी कामत यांचे नाव जरी चर्चेत असले तरी त्यांचे विरोधी पक्ष नेतेपद कायम ठेवले जाणार असल्याचा अंदाज असून कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील 2017 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 17 जागा जिंकल्या होत्या तर 2022 च्या निवडणुकीत फक्त 11 जागा मिळाल्या आणि पक्षाची कामगिरी खराब झाल्याचे समोर आले आहे.

Related Stories

फोंडा शहरातील दृष्टिहीन सीसीटिव्ही कॅमेरे बदलणार तरी कधी?

Patil_p

सत्तरी तालुक्मयात कोरोना स्थिती चिंताजनक

Amit Kulkarni

देरोडे सत्तरीत घरावर वीज पडून नुकसान

Amit Kulkarni

सभापतींना सरकारचा कर्मचारी समजू नका

Amit Kulkarni

पंचायतींचे चित्र आज होणार स्पष्ट

Amit Kulkarni

गावी जाण्यासाठी मजुरांचा आग्रह

Omkar B