प्रतिनिधी / पणजी
जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा गोव्यातील किल्ला पूर्णत: ढेपाळल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर पक्षातील अनेक नेत्यांनी टीकेचा भडिमार केल्यानंतर चोडणकर यांनी अध्यक्षपदाचा पुन्हा एकदा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केल्याचे वृत्त आहे.
चोडणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अयशस्वी ठरला. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही सदर वृत्तास दुजोरा दिला नाही. परंतु प्रचंड दबावाखाली असलेल्या चोडणकर यांनी बुधवारी कोणाशीही बोलणेच टाळले.