Tarun Bharat

गिरोली येथे अनोळखी बेवारस पुरुषाचा मृतदेह सापडला

Advertisements

वारणानगर / प्रतिनिधी

गिरोली (ता.पन्हाळा) गावचे हद्दीतील गुंडलकी शेताशेजारील वनविभागाचे हद्दीत एक अनोळखी बेवारस अंदाजे (वय ४०) पुरुष जातीचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली असून या बाबतची वर्दी गिरोलीचे पोलीस पाटील मोहन उत्तम कदम यांनी कोडोली पोलीस ठाण्यात दिली.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गुरुवार ता.३ रोजी दुपारी साडेतीन वाजता गिरोली ते केखले जाणारे रोडवरील गिरोली गावचे हद्दीतील गुंडलकी शेताशेजारील वनविभागाचे हद्दीत सडलेल्या अवस्थेत व गावठी कुत्र्यांनी लचके तोडलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. ही गोष्ट पोलीस पाटलांना समजताच त्यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संकपाळ करीत आहेत.

Related Stories

कोरोना संशयित 90 जणांचे स्वॅब तपासणीसाठी मिरजेला

Archana Banage

भुये येथे ग्रामीणस्तरीय क्रांतिकारक फुटबॉल लीग स्पर्धा

Archana Banage

कोल्हापूर : पेठ वडगाव शहरात कोरोना रुग्णसंख्या १०४ वर

Archana Banage

अभिनेता सोनू सूद ‘आयकर’च्या रडारवर

Archana Banage

पाटबंधारे विभाग आणि पोलिसांच्या विरोधास धुडकावून अखेर शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या राधानगरी धरणस्थळावर शाहू जयंती साजरी

Archana Banage

भारतीय सैन्यांकडून पाकच्या चौक्या उध्वस्त

datta jadhav
error: Content is protected !!