मराठी अभिनेत्री श्रिया पिळगावकर मुख्य भूमिकेत
अमेझॉन ओरिजिनल सीरिज ‘गिल्टी माइंड्स’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्राइम व्हिडिओने स्वतःच्या आगामी लिगल ड्रामाच्या ट्रेलरला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले आहे. या सीरिजमध्ये अभिनेत्री श्रिया पिळगावकर आणि वरुण मित्रा मुख्य भूमिकेत आहेत. गिल्टी माइंड्स ही सीरिज 22 एप्रिल रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.


शेफाली भूषण यांचे दिग्दर्शन आणि जयंत दिगंबर सोमालकर यांच्या सह-दिग्दर्शनात तयार झालेल्या या सीरिजमध्ये दोन तरुण आणि महत्त्वाकांक्षी वकिलांचा प्रवास दर्शविण्यात आला आहे. यातील एक वकील सद्गुणांचा पुतळा तर दुसरा प्रख्यात लॉ-फर्मशी संबंधित आणि गुन्हेगारी लोकांसोबत व्यवहार करताना दिसून येणार आहे.
सीरिजमध्ये नम्रता सेठ, सुगंधा गर्ग, कुलभूषण खरबंदा, सतीश कौशिक, बेंजामीन गिलानी, वीरेंद्र शर्मा, दीक्षा जुनेजा, प्रणय पचौरी, दीपक कालरा आणि चित्रांगदा सतरुपा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याचबरोबर करिश्मा तन्ना, शक्ती कपूर, सुचित्रा कृष्णमूर्ती, गिरीश कुलकर्णी आणि सानंद वर्मा यासारखे कलाकार विशेष भूमिकेत दिसून येतील.