Tarun Bharat

गुंजीनजीकच्या अपघातातील जखमीचा मृत्यू

गुंजी / वार्ताहर

 गेल्या 2 डिसेंबर रोजी गुंजीनजीक राष्ट्रीय महामार्गावर मोटारसायकलस्वाराला एका अवजड वाहनाने ठोकरल्याने अपघात घडला होता. या अपघातात शिवाजी मारुती दळवी हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तातडीने बेळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान मंगळवार दि. 22 रोजी सकाळी त्यांचे निधन झाले.

  त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे,   सायंकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. रात्री त्यांच्या भटवाडा गावात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Stories

सराफी पेढीतील चेन पळविणाऱया जोडगोळीला अटक

tarunbharat

तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा आंदोलन

Omkar B

कोरोनाचा नायनाट कर, समृद्ध जीवनाची दिशा दे !

Patil_p

विकास कामांसंदर्भात आमदारांची आयुक्तांशी चर्चा

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांच्या दोन गटात हाणामारी

Amit Kulkarni

एकदाच जळाले सरण, मात्र घरच्यांचे रोजचेच मरण!

Amit Kulkarni