Tarun Bharat

गुंड नवनाथचा खून नशेत, संशयित पोलिसांच्या ताब्यात

सांगली/प्रतिनिधी

शहरातील कॉलेज कॉर्नरवरील आर्या पान शॉपसमोरील बोळात असणाऱ्या सात आर कॅफेच्या समोर रेकॉर्डवरील गुन्हेगार नवनाथ  लवटे वय २६ रा. शिवशंभो चौक कर्नाक रोड सांगली यांचा धारदार गुप्तीने हल्ला करून खून करणारा संशयित गुंड योगेश दिलीप शिंदे वय २५ रा. लक्ष्मीनगर, सांगली हा नशेखोर आहे. त्याने नशेतचा खून केला आहे त्याला उपचारासाठी पोलीसांनी वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे.  हा खून नेमक्या कोणत्या कारणावरून झाला हे कारण अद्यापही अस्पष्ट आहे या खूनप्रकरणी मयत नवनाथ याचा भाऊ गोरखनाथ  लवटे यांने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुंड नवनाथ लवटे याचा शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास गुप्तीने हल्ला करून खून करण्यात आला आहे हा खुन योगेश शिंदे याने केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यावर विश्रामबाग पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले त्याने नशा मोठ्याप्रमाणात  केली होती. म्हणून त्याला उपचारासाठी पोलीसांनी वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले आहे

Related Stories

भागिरथी होम मिनिस्टर स्पर्धेत प्रणिता फराकटे प्रथम

Abhijeet Khandekar

आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहतील: चंद्रकांत पाटील

Archana Banage

Sangli : पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात संततधार

Abhijeet Khandekar

कुवेतमधील 8 लाख भारतीय संकटात

Patil_p

महागाईविरोधात उद्या बिंदू चौकात महाधरणे आंदोलन

Archana Banage

शिवराज्याभिषेक दिनी आनंदाची बातमी! रायगडावर सापडली ‘बा’ रायगड टीमला स्वराज्याची दौलत

Rahul Gadkar