Tarun Bharat

गुंड ‘विकी’च्या आवळल्या मुसक्या

मुंबईहून गोव्यात आला असता सापडला जाळय़ात : मुंबई, पणजी पोलिसांची संयुक्त कारवाई,विकीवर महाराष्ट्रात 33 गंभीर गुन्हे नोंद

प्रतिनिधी /पणजी

महाराष्ट्रात अनेक गुन्हेगारी प्रकरणांत सहभागी असलेला कुख्यात गुंड विक्रांत देशमुख उर्फ विकी याला काल रविवारी 31 जुलै रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास पणजीत केलेल्या कारवाईत बंदुकीसह अटक करण्यात आली असून त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे. तब्बल 33 प्रकारचे गंभीर गुन्हे करुन पोलिसांना चकवा देणाऱया विकीला नुकत्याच झालेल्या एका गाजलेल्या खून प्रकरणी पकडण्यासाठी त्याचा शोध घेत मुंबई पोलीस गोव्यात पोचले होते. मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस व पणजी पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली.

उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी काल रविवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत या कारवाईबाबत सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत विकीला अटक करण्यात प्रत्यक्ष सहभागी असलेले नवी मुंबई सीआयडी पोलीस निरीक्षक विजयसिंग भोसले व त्यांची टीम, तसेच पणजी पोलीस स्थानकाचे निरीक्षक निखिल पालेकर, उपनिरीक्षक मयुर पणशीकर, हवालदार नितीन गावकर, कॉन्स्टेबल आदित्य म्हार्दोळकर, मनोज पेडणेकर, परेश बुगडे व रामा घाडी उपस्थित हेते. सक्सेना यांनी कारवाई करणाऱया पोलिसांचे अभिनंदन केले.

विकीवर महाराष्ट्रात 33 गंभीर गुन्हे  

खून, दरोडे, खंडणी, चोरी यासारखे सुमारे 33 गुन्हे महाराष्ट्रातील विविध पोलीस स्थानकांत अट्टल गुन्हेगार विकी याच्यावर नोंद आहेत. मुंबईतील गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस गेली चार वर्षे त्याचा शोध घेत होते. त्याला अखेर गोव्यात काल रविवारी अटक करण्यात आली. नेरुल मुंबई येथील खून प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे उघड होताच मुंबई पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास प्रारंभ केला होता.

विकी पणजीत असल्याची मिळाली माहिती

कुख्यात गुंड विकी हा गोव्यात असल्याची माहिती मुंबई सीआयडी पोलिसांना मिळाली होती. शनिवारी सकाळी मुंबई सीआयडी पोलीस पणजी पोलीस स्थानकात दाखल झाले आणि संयुक्तरित्या ‘ऑपरेशन विकी’ सुरू केले. शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून हे ऑपरेशन सुरू होते. संध्याकाळपर्यंत विकी पणजीतच असल्याची ठोस माहिती पोलिसांना मिळाली.

कॅसिनोत जाताना विकीच्या आवळल्या मुसक्या

शनिवारी सायंकाळी येथील क्रॉस रोड बारजवळ विकीची गाडी उभी होती, मात्र त्यात तो नव्हता. गाडी विकीची असल्याची खात्री पटल्यानंतर पोलीस त्या गाडीवर पाळत ठेवून होते. मध्यरात्रीनंतर विकी पॅसिनोमध्ये जाण्यासाठी या गाडीजवळ आला. त्याने सेन्सरद्वारे गाडीची दारे अनलॉक करताच गाडीवर पाळत ठेवून असलेले पोलीस अलर्ट झाले. त्याच दरम्यान त्याने तिथे असलेल्या मुंबई सीआयडी पोलिसांना पाहिले आणि धूम ठोकली. पळत पळत तो पॅसिनोच्या दिशेने जात होता. पॅसिनोत जाणार तोच त्याला पोलिसांनी अटक केली.

दोन तासांच्या लपंडावानंतर विकी जेरबंद

सुमारे दोन तास त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पळापळ सुरुच होती. अखेर त्याला अटक केली. त्याच्याकडील पिस्तुल व जिवंत सहा गोळ्या जप्त केल्या आणि त्याची कारही जप्त करण्यात आली. त्याच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्याला न्यायाधीशाच्यासमोर हजर करण्यात आले असता त्याला ट्रान्झिट रिमांड मंजूर करण्यात आला.

गोव्यात मौजमजेसाठी येत होता विकी

शनिवारी सकाळी अट्टल गुन्हेगार विक्रांत देशमुख हा गोव्यात आला होता.  सकाळी तो येथील एका हॉटेलात राहिला होता. संध्याकाळी पॅसिनोत जाण्याचा त्याचा इरादा होता. विकी हा नियमित गोव्यात पॅसिनोत जुगार खेळण्यासाठी येत होता. एखादे गुन्हेगारी प्रकरण झाले की त्याच्यातून मिळणाऱया पैशांतून गोव्यात मौजमजा करण्यासाठी तो येत होता. या अगोदर अनेकवेळा गोव्यात आला होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. स्वतःची गाडी घेऊन तो एकटाच गोव्यात येत होता. काही दिवस गोव्यात राहिल्यानंतर पुन्हा तो परत जात होता. या खेपेस त्याचा डाव फसला. तो गोव्यात असल्याची माहिती नवी मुंबई सीआयडी पोलिसांना मिळाली आणि गोवा पोलिसांच्या सहकार्याने त्याला गजाआड करण्यात यश मिळविले.

Related Stories

साखळी मतदार संघात विविध कार्यक्रम..!

Patil_p

कामुर्लीत घराला आग लागून 3 लाखाचे नुकसान

Amit Kulkarni

डिचोली तालुक्मयात शनिवारी 57 कोरोना रूग्ण सापडले

Patil_p

भाजप सत्तेत आल्यास भूमिपुत्र विधेयक कायद्यात रूपांतरित करेल

Amit Kulkarni

मंत्री मिलिंद नाईक यांना हटवून एफआयआर नोंदवा

Patil_p

कोरोनाचे रविवारी पाच बळी

Omkar B