Tarun Bharat

गुगलने ‘प्ले स्टोर’वरून हटवले 30 अ‍ॅप्स

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असलेले 30 अ‍ॅप्स गुगलने ‘प्ले स्टोर’वरून हटविले आहेत. आता नवीन युजर्स प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप्स डाउनलोड करू शकणार नाहीत.पण ते आधीच 20 लाख वेळा डाउनलोड केले गेले आहेत. युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनमधून हे अ‍ॅप्स ताबडतोब डिलीट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

या 30 अ‍ॅप्समध्ये धोकादायक मालवेअर असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे गुगलने हा निर्णय घेतला आहे. फ्रंट अ‍ॅप्सच्या यादीतील बहुतेक युजर्सनी मालवेअर असलेले तृतीय-पक्ष सेल्फी अ‍ॅप्स डाउनलोड केले आहेत.

WhiteOps च्या सिक्योरिटी रिसर्चर्सने या अ‍ॅप्सची माहिती दिली आहे. या अ‍ॅप्समध्ये अनेक जाहिराती दाखवल्या जातात. तसेच एकदा डाऊनलोड केल्यावर ते डिलीट करणंही कठीण होते. त्यामुळे गुगलने सांगितलेले 30 अ‍ॅप्स फोनमध्ये असल्यास युजर्सने ते त्वरित डिलिट करावेत. हे अ‍ॅप्स जाहिराती दाखवण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. पहिल्यांदा अ‍ॅप पब्लिश केल्यानंतर फ्रॉड करणारी मंडळी अकराव्या दिवशी पुन्हा नवीन अ‍ॅप पब्लिश करतात.

Yoriko Camera, Solu Camera, Lite Beauty Camera, Beauty Collage Lite, Beauty and Filters camera, Photo Collage and beauty camera, Gaty Beauty Camera, Pand Selife Beauty Camera, Cartoon Photo Editor and Selfie Beauty Camera, Benbu Seilfe Beauty Camera, Pinut Selife Beauty and Photo Editor, Mood Photo Editor and Selife Beauty Camera     

Rose Photo Editor and Selfie Beauty Camera, Selife Beauty Camera and Photo Editor, Fog Selife Beauty Camera, First Selife Beauty Camera and Photo Editor, Vanu Selife Beauty Camera, Sun Pro Beauty Camera, Funny Sweet Beauty Camera, Little Bee Beauty Camera, Beauty Camera and Photo Editor Pro, Grass Beauty Camera, Ele Beauty Camera, Flower Beauty Camera, Best Selfie Beauty Camera, Orange Camera, Sunny Beauty Camera, Pro Selfie Beauty Camera, Selfie Beauty Camera Pro, आणि Elegant Beauty Cam-2019 अशी प्ले स्टोरवरून हटवण्यात आलेल्या अ‍ॅप्सची नावे आहेत.

Related Stories

सागरी क्षेत्रात नोकरीची संधी : अजित पवार

datta jadhav

शाहू माने व मेहुली घोष यांचा सुवर्णवेध

Abhijeet Shinde

नक्षलवाद्यांच्या IED स्फोटात जवान जखमी

datta jadhav

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक, राज्यभर जेलभरो आंदोलन सुरू

Rohan_P

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सलमानला अटक

Rohan_P

संदीप देसाई ! राष्ट्रवादीतून पुन्हा भाजपमध्ये…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!