Tarun Bharat

गुगलविरुद्ध भारतात पुन्हा चौकशीचे आदेश; एकाधिकारशाहिचा आरोप

ऑनलाईन टिम / नवी दिल्ली

भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (सीसीआय) सर्च इंजिन गुगल या कंपनीला आपल्या क्षेत्रात निर्माण केलेल्या एकाधिकाराशाहीमुळे भारतातही अपलाभ घेत आहे का या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सीसीआयने डिजिटल न्यूज पब्लिशर्स असोसिएशनच्या (डीएनपीए) तक्रारीनंतर हे मान्य केले आहे की प्रतिस्पर्धा कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन गुगल सर्च इंजिनने केले आहे. याअगोदरसुद्धा ऑनलाइन जाहिराती व अॅप डेव्हलपर्सकडून प्लेस्टोअरच्या नावाखाली अवाढव्य रक्कम उकळल्याप्रकरणी गुगलची भारतात चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर आयोगाने आदेशात असेही मान्य केले आहे की, गुगल आपल्या ताकदीचा दुरुपयोग करून डिजिटल न्यूज पब्लिशर्सवर अवास्तव अटी लादत आहे.

डीएनपीएच्या तक्रारीनुसार, एखादी माहिती सर्च केल्यानंतर कोणती वेबसाइट सर्वात दिसेल हे गुगल आपल्या अल्गोरिदमद्वारे ठरवते. भारतातील न्यूज प्रकाशक आपल्या दर्जेदार मजकुरासाठी मोठी गुंतवणूक करतात. मात्र आपल्या एकाधिकारशाहीमुळे गुगल जाहिरातींमुळे कंपनींना मिळणाऱ्या रकमेचा मोठा भाग स्वत:जवळ ठेवून घेते. तसेच आपल्या गुगल न्यूज या प्लॅटफॉर्मवरही इतर पब्लिशर्सचा कंटेंट दाखवून भरघोस कमाई करत आहे.

दरम्यान आयोगाने गुगल व त्याची मूळ कंपनी अल्फाबेटविरुद्ध ६० दिवसांत तपास अहवाल मागवला असून आयोगाने लोकशाहीत न्यूज मीडियाची महत्त्वाची भूमिका आहे त्यामुळे बड्या टेक कंपन्यांना एकाधिकाराचा दुरुपयोग करता येऊ नये तसेच जाहिरात महसुलाचे सर्व कंपन्यांमध्ये योग्य वाटप झाले पाहिजे असेही म्हटले आहे.

Related Stories

नक्षलवाद्यांविरोधातील कारवायांना देणार बळ

Patil_p

युपी : पुढील आदेशापर्यंत बोर्ड परीक्षा स्थगित

Tousif Mujawar

पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाहतूक मार्गाचे उद्घाटन

Patil_p

जिंकून दाखवणारच! उद्धव ठाकरेंचा निर्धार

Archana Banage

काँग्रेस नेते मोतीलाल वोरा यांचे निधन

Patil_p

पुणे-नगर-नाशिक-औरंगाबाद-बीडला निसर्ग झोडपणार

datta jadhav