Tarun Bharat

गुजरातचा चेन्नईवर 7 गडय़ांनी विजय

सामनावीर वृद्धिमान साहाचे नाबाद अर्धशतक, शमीचे 2 बळी

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

सामनावीर वृद्धिमान साहाने झळकवलेले नाबाद अर्धशतक आणि दर्जेदार गोलंदाजीच्या आधारावर गुजरात टायटन्सने चेन्नई सुपरकिंग्सचा 7 गडय़ांनी दणदणीत पराभव करून टॉप दोनमधील स्थानही निश्चित केले.

गुजरातने प्रथम शानदार गोलंदाजी करून चेन्नईला 20 षटकांत 5 बाद 133 धावांवर रोखले. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने अर्धशतक नोंदवले. त्यानंतर साहाने 57 चेंडूत नाबाद 67 धावा फटकावत गुजरातला 19.1 षटकांतच विजय मिळवून दिला. चेन्नई संघ प्लेऑफच्या शर्यतीतून याआधीच बाहेर पडला असून गुजरातने मात्र या विजयाने पहिल्या दोनमधील स्थान निश्चित केले. आयपीएल पदार्पणातच त्यांनी शानदार प्रदर्शन केले आहे.

साहाने आपल्या खेळीत 8 चौकार, एक षटकार मारताना प्रथम शुभमन गिलसमवेत 7.1 षटकांत 59 धावाची सलामी दिली. गिलने 3 चौकारांसह 18 धावा केल्या. नंतर मॅथ्यू वेडसमवेत 31 धावांची भर घातल्यावर वेड (15 चेंडूत 20) व कर्णधार हार्दिक पंडय़ा (7) दहा धावांच्या फरकाने बाद झाले. नंतर डेव्हिड मिलरच्या (नाबाद 15) साथीने साहाने विजयाचे सोपस्कार शेवटच्या षटकात पूर्ण केले.

त्याआधी चेन्नईच्या डावात गायकवाड (53), मोईन अली (21), नारायण जगदीशन (नाबाद 39) या तिघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. गायकवाडने दुसऱया गडय़ासाठी मोईन अलीसमवेत 57 धावांची, त्यानंतर जगदीशनसवेमत 48 धावांची भर घातली. मध्यफळी कोसळल्यानंतर चेन्नईला शेवटच्या 5 षटकांत केवळ 24 धावा काढता आल्या. गुजरातच्या शमीने 2, रशिद खान, अल्झारी जोसेफ, आर. साई किशोर यांनी एकेक बळी मिळविला. या सामन्यात चेन्नईने मथीशा पथिरानाला पदार्पणाची संधी दिली. त्याने 2 बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक ः चेन्नई सुपरकिंग्स 20 षटकांत 5 बाद 133 ः गायकवाड 49 चेंडूत 53, मोईन अली 17 चेंडूत 2 षटकारांसह 21, जगदीशन 33 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह नाबाद 39, अवांतर 7, गोलंदाजी ः शमी 2-19, रशिद खान 1-31, जोसेफ 1-15, आर.साईकिशोर 1-31.

गुजरात टायटन्स 19.1 षटकांत 3 बाद 137 ः साहा 67 (57 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), गिल 17 चेंडूत 18, मॅथ्यू वेड 15 चेंडूत 20, हार्दिक पंडय़ा 7, मिलर 20 चेंडूत नाबाद 15, अवांतर 10. गोलंदाजी ः मथीशा पथिराना 2-24, मोईन अली 1-11.

Related Stories

टय़ुनिशियाच्या अहमदला ‘सरप्राईज गोल्ड’

Patil_p

दोन ‘रॉयल्स’ संघ आज पुन्हा आमनेसामने

Patil_p

रवि दहिया आज सुवर्णपदकासाठी लढणार!

Patil_p

जेसॉन रॉयची आयपीएलमधून माघार

Patil_p

इटलीत विजयोत्सव करताना अनेक जखमी, एकाचा मृत्यू

Patil_p

पाक कसोटी संघाच्या कर्णधारपदी बाबर आझम

Omkar B
error: Content is protected !!