Tarun Bharat

गुजरातच्या आणखी एका रुग्णालयात आग; ICU मधील 70 रुग्ण सुरक्षित

Advertisements

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :


एकीकडे कोरोना संकट वेगाने वाढत आहे. तर या  संकटादरम्यान देशात विविध ठिकाणी रुग्णालयांत आग लागण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. आता गुजरातच्या भावनगर स्थित जनरेशन रुग्णालयात आग लागल्याची माहिती समोर येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. ही घटना घडली तेव्हा आयसीयूमध्ये 70 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू होते. या सर्व रुग्णांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले आहे. यामध्ये काही पेशंट ऑक्सिजन सपोर्टवर होते. त्यांना ऑक्सिजन सिलिंडरसहीत बाहेर आणण्यात आले आणि जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 


 रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे. आग लागताच सर्वप्रथम रुग्णांना बाहेर काढण्यात आले तसंच अग्निशमन दलाला तातडीने याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. 

  • भरूचमध्ये लागलेल्या आगीत 16 जणांचा मृत्यू


यापूर्वी 30 एप्रिल रोजी गुजरातच्या भरूच शहरातील वेल्फेअर रुग्णालयातील कोविड केअर वॉर्डला लागलेल्या आगीत 14 रुग्ण आणि दोन नर्सेसचा होरपळून आणि श्वास कोंडल्याने मृत्यू झाला होता.

Related Stories

दिल्लीत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

datta jadhav

उत्तराखंडात 530 नवे कोरोना रुग्ण; एकूण आकडा 73 हजार पार

Rohan_P

हैदराबादमध्ये देशातील पहिले मध्यस्थी केंद्र

Patil_p

आमदार निलंबन प्रकरणी महाराष्ट्र सरकारला नोटीस

Patil_p

पंजाबमध्ये आप आमदार वादात

Amit Kulkarni

मनीष सिसोदियांच्या लॉकरची सीबीआयकडून झडती

Patil_p
error: Content is protected !!