ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातमधील सर्वात मोठे शहर असलेल्या अहमदाबाद शहरामध्ये 21 मे पर्यंत कोरोना कर्फ्यू वाढविण्यात आला आहे. अहमदाबाद पोलिसांनी याबाबत माहिती दिली.


पोलिसांनी सांगितले की, कोरोना कर्फ्यू काळात केवळ अती अत्यावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू राहतील. यामध्ये दवाखाने, ऑक्सिजन सप्लाय सेंटर, लसीकरण सेंटर आणि कोविड उपचार संबंधित अन्य परिसराचा सहभाग आहे. या व्यतिरिक्त बाकी सर्व दुकाने, मॉल आणि मार्केट बंद ठेवली जाणार आहेत. यासोबतच उद्याने आणि स्विमिंग पूल देखील बंद असणार आहेत. शहरात वाढत असलेली कोरोना संख्या रोखण्यासाठी प्रशासनाकडून कर्फ्यू जारी करण्यात आला आहे.
कोरोना रुग्ण वाढीचा विचार केल्यास गुजरातमध्ये अहमदाबाद, सुरत, वडोदरा आणि राजकोटमध्ये या शहरात राज्यातील अर्धे रुग्ण आहेत. एकट्या अहमदाबाद शहरात 26,616 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा 2 लाख 26 हजार 029 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 3,232 जणांचा मृत्यू झाला आहे.