Tarun Bharat

गुजरातमध्ये राजधानी एक्सप्रेस उलटविण्याचा प्रयत्न फसला

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

मुंबई-दिल्ली राजधानी एक्सप्रेस गुजरातमधील वलसाडजवळ रेल्वे रुळावर काही उपद्रवी लोकांनी ठेवलेल्या सिमेंटच्या खांबाला धडकली. सुदैवाने हा खांब रुळाच्या खाली पडल्याने मोठी दुर्घटना टळली. शुक्रवारी संध्याकाळी 7.10 च्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ काही समाजकंटकांनी रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब टाकून रेल्वे उलटविण्याचा कट रचला होता. शुक्रवारी संध्याकाळी 7.10 च्या सुमारास मुंबई-हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस रेल्वे ट्रकवर ठेवलेल्या सिमेंटच्या खांबाला धडकली. त्यानंतर हा खांब रुळावरुन खाली पडला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, सुरत रेंजचे डीजी, वलसाड पोलीस, जीआरपी आणि आरपीएफ यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे राजधानीसह सर्व गाडय़ा थांबवण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

उत्तराखंडात 505 नवे कोरोना रुग्ण; 14 मृत्यू

Tousif Mujawar

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांचा हल्ला; 2 जवान शहीद

Tousif Mujawar

उत्तराखंडात 448 नवे कोरोना रुग्ण; 13 मृत्यू

Tousif Mujawar

“दादरमध्ये उभारण्यात येणारं प्रति सेनाभवन नाही, तर…” उदय सामंतांचे ट्विट करत स्पष्टीकरण

Archana Banage

दिल्ली दंगल प्रकरणी पहिली शिक्षा

Amit Kulkarni

तेरणी येथे युवकाची आत्महत्या

Abhijeet Khandekar