अहमदाबाद : गुजरातमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात वैदिक गणिताचा समावेश केला जाणार आहे अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. विश्वविख्यात गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनी गुरुवारी गुजरातचे शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी याबद्दल माहिती दिली. रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 या दिवशी झाला होता. हा दिवस जागतिक गणित दिन म्हणून साजरा केला जातो. गुजरातमध्ये वैदिक गणित सहाव्या इयत्तेपासून दहाव्या इयत्तेपर्यंत टप्प्याटप्प्याने शिकविले जाणार आहे. या गणितामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता अधिक वाढण्यास साहाय्य होईल असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.


previous post