Tarun Bharat

गुजरात, अंदमानमध्ये भूकंपाचे धक्के

अहमदाबाद / वृत्तसंस्था

गुजरातमधील कच्छ जिह्यात रविवारी 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. तसेच अंदमानमध्येही रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाच्या हादऱयांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. गुजरातमधील भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छ जिह्यातील रापरपासून एक किमी पश्चिम-दक्षिण-पश्चिमेस 12.2 किमी खोलीवर होता. जिह्यात गेल्या एका महिन्यात पाचवेळा 3 रिश्टर स्केलहून अधिक तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Related Stories

कोरोनाचा विळखा देशात अधिकच घट्ट

Patil_p

50 वर्षांवरील नागरिकांना मार्चपासून लसीकरण

Patil_p

भाजप कार्यकर्त्यांसह सुमित्रा महाजन पोलिसांच्या ताब्यात

prashant_c

कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात; संक्रमण वाढण्याचा WHO चा इशारा

Tousif Mujawar

हैदराबाद विमानतळावर 11 प्रवाशांकडून जप्त केले 1.66 कोटींचे सोने

Tousif Mujawar

आजचे भविष्य मंगळवार दि. 21 मार्च 2023

Patil_p