Tarun Bharat

गुजरात उच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांचा शपथविधी

अहमदाबाद / वृत्तसंस्था

गुजरात उच्च न्यायालयाच्या सात नवनियुक्त न्यायाधीशांनी शपथग्रहण केले आहे. त्यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मौना मनीष भट्ट, मनीष ज्योतिंद्रप्रसाद दवे, हेमंत महेशचंद्र प्रच्छक, संदीप नवरतलाल भट्ट, अनिरुद्ध प्रद्युन्म मये, निराल रश्मीकांत मेहता आणि निशा महेंद्रभाई ठाकोर अशी नवनियुक्त न्यायाधीशांची नावे आहेत.

हे सातही जण न्यायाधीश होण्याअगोदर वकील होते. त्यांना गेल्या शनिवारी न्यायाधीशपदी पदोन्नती देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने त्यांच्या नावांची सूचना केली होती. शपथविधी कार्यक्रमाला मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, कायदा मंत्री राजेंद्र त्रिवेदी, ऍडव्होकेट जनरल कमल त्रिवेदी, ऍडिशनल सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू आणि गुजरात उच्च न्यायालयाचे अनेक ज्येष्ठ न्यायमूर्ती उपस्थित होते. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. विक्रम नाथ आणि न्या. बेला त्रिवेदी यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या आता 32 झाली आहे. या उच्च न्यायालयात एकंदर न्यायाधीशांची संख्या 52 आहे. त्यामुळे अद्यापही 20 पदे रिक्त आहेत.

Related Stories

भारतीय सैनिकांनी घडवले शत्रुत्वापेक्षा माणुसकीचे दर्शन

Patil_p

हमीदच्या जागी हनीफला डिस्चार्ज

Patil_p

दुसऱ्याच्या भूमीत घुसून अद्दल घडवण्यास सज्ज

Patil_p

जगातील 58,700 मोठय़ा धरणांना धोका

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांनी पार 68 हजारांचा आकडा

Tousif Mujawar

हवाई दलप्रमुख फ्रान्स दौऱयावर

Patil_p