Tarun Bharat

गुजरात : गोडाउनमध्ये स्फोट; चार जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / अहमदाबाद : 


गुजरातमध्ये बुधवारी सकाळी एका गोडाऊनमध्ये मोठा स्फोट झाल्याने चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटाचा धक्का एवढा जबर होता की, या स्फोटामुळे गोडाऊनमधील माल आणि भिंत आंगवर कोसळल्याने चार कामगारांचा जागीच मृत्यू झाला. भिंत आगवर कोसळण्याने यामध्ये 12 जण दबले गेले. यातील 8 जखमींना एलजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून मदत कार्य सुरू आहे. यातील 12 जणांना बाहेर काढले असून यातील चार जण गंभीर जखमी तर आठ जण जखमी झाले आहेत.  


पिराना पिपळज रोड वर हा स्फोट झाला असून, यामध्ये जखमी झालेल्या एकूण 12 जणांपैकी 4 जणांचा मृत्यू झाला तर अन्य 8 जणांवर उपचार सुरू आहेत.

Related Stories

शरद पवार सकाळी 11 वाजता साधणार जनतेशी संवाद

prashant_c

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा रद्द

datta jadhav

मुंबईतील 93 च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी 4 अटकेत

datta jadhav

किरीट सोमय्या यांनी दापोलीत येऊनच दाखवावे

Abhijeet Khandekar

काँग्रेसमध्ये घडणार मोठा भूकंप

Patil_p

बारावीचे ‘रिपिटर्स’ही परीक्षेविना उत्तीर्ण

Patil_p