ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गुजरातचे शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुडासमा यांनी बुधवारी दिली.


ते म्हणाले, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आली असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह दुसरे केंद्रीय बोर्ड सीआयएससीई आणि हरियाणासह दुसऱ्या राज्यांच्या बोर्डाने देखील बारावीची परीक्षा रद्द केली असल्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, यापूर्वी गुजरात बोर्डाने माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक वर्गाच्या बोर्ड परीक्षांच्या सुधारित परीक्षांच्या तारखांची नुकतीच घोषणा केली होती. त्यानुसार 1 ते 10 जुलै दरम्यान परीक्षा होणार होती. मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे.