Tarun Bharat

गुजरात : ‘लूडो’ गेममध्ये हरल्याने पतीकडून पत्नीस मारहाण

ऑनलाईन टीम / वडोदरा :

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. लॉक डाऊन च्या काळात अनेक घरांमध्ये सध्या ‘टाइमपास’साठी मोबाइलवर ‘लूडो’ गेम सर्रास खेळला जातोय. यातच गुजरातच्या वडोदरा मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे.

एका कुटुंबातील एक दाम्पत्य हा गेम खेळत होते. या गेममध्ये पत्नीकडून वारंवार हरल्यानंतर एका दाम्पत्यामध्ये भांडणाला सुरूवात झाली. भांडण इतकं वाढलं की पतीने पत्नीला मारहाण करत तिच्या पाठीचा कणा तोडला, अखेर पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय वेमाली येथे राहणारी एक महिला घरात शिकवणी घेते. तर, तिचा पती एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतो. लॉक डाउनदरम्यान पतीने सोसायटीमध्ये बाहेर इतरांसोबत वेळ घालवण्याऐवजी घरातच राहावे यासाठी तिने त्याला मोबाइलवर लूडो गेम खेळण्यास मनवले. तो गेम खेळण्यास तयार झाला.

पण, त्याच्या पत्नीकडून  गेममध्ये सातत्याने त्याचा पराभव झाला. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि हा वाद इतका विकोपाला गेला की त्याने पत्नीला बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. नंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.


उपचारानंतर पत्नीची तब्येत सुधारली असून  पतीच्या घरी जाण्यास नकार दिला. पण, दोघांच्या समुपदेशनानंतर पतीने पत्नीची माफी मागितली. त्यामुळे पत्नीने त्याच्यासोबत पुन्हा घरी जाण्यासाठी तयार झाली. त्यानंतर पत्नीला पुन्हा मारहाण न करण्याची ताकीद पतीला देण्यात आली आहे. 

Related Stories

‘बेल बॉटम’चे प्रदर्शन लांबणीवर

Patil_p

‘यूएईत’ होणार आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम

Archana Banage

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

Patil_p

भारतीय अधिकाऱयांनी घेतली कुलभूषण जाधवांची भेट

Patil_p

दिल्लीत भाजपला बहुमत मिळणार : स्वामी

Patil_p

ठाकरे-शिंदे एकत्र येणार?; दिपाली सय्यद यांच्या ट्विटने चर्चांना उधाण

datta jadhav