Tarun Bharat

गुजरीत फोटोवरून मागितली 5 लाखांची खंडणी, तिघांवर गुन्हा

महिलेसह तिघांवर गुन्हा, जुना राजवाडा पोलिसांची माहिती

प्रतिनिधी/कोल्हापूर

गुजरीतील एका इमिटेशन ज्वेलरी दुकानात माझा फोटो का लावला, असा जाब विचारत 5 लाखांची खंडणी दे अन्यथा दुकान फोडेन, अशी धमकी दिल्या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा नोंद झाला आहे.

गुजरीतील एका इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात मंगळवारी एक महिला खरेदीसाठी गेली होती. तेथे दुकानात तिचा फोटो लावल्याचे दिसून आले. तिने यासंदर्भात दुकानदाराकडे चौकशी केली. यावेळी तो नेटवरून घेतल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या महिलेने दुकानदाराकडे तक्रार केली. दुकानदाराने प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बुधवारी संबंधित महिला अन्य दोघांना घेऊन या इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात आली. यावेळी दुकानदाराला न विचारता फोटो का लावला, असा जाब विचारत या तिघांनी दुकानदाराकडे 5 लाखांची मागणी केली. तसेच 5 लाखांची खंडणी न दिल्यास दुकान फोडण्याची धमकी दिली. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा महिलेसह तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.

Related Stories

दोन राजकीय जोडप्यासह ६ जण लॉजवरील छाप्यामध्ये ताब्यात

Archana Banage

कोल्हापूर : युवकांच्या धाडसामुळे तलावात बुडणार्‍या महिलेचे वाचले प्राण

Archana Banage

शिरोळ तालुका पूरग्रस्तांसाठी कायमस्वरूपी तोडगा काढणार – ना. राजेंद्र यड्रावकर

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यातील ३ मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

Archana Banage

शाहूवाडी तालुक्यात राजाराम कारखान्याच्या मतदानासाठी चुरस

Archana Banage

कोल्हापूर : ….तर शिरोली बनेल गुन्हेगारांची राजधानी

Archana Banage
error: Content is protected !!