तरुण भारत

गुजरातमध्ये ‘आप’ची 15 मेपासून परिवर्तन यात्रा

अहमदाबाद

 दिल्लीनंतर पंजाब निवडणुकीत मोठा विजय मिळालेल्याने उत्साह दुणावलेल्या आम आदमी पक्षाची नजर आता गुजरात निवडणुकीवर केंद्रीत झाली आहे. आम आदमी पक्ष 15 मेपासून गुजरातमध्ये परिवर्तन यात्रेचे आयोजन करणार आहे. ही यात्रा राज्यातील सर्व 182 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोहोचणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

Advertisements

गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे हे गृह राज्य आहे. गुजरातला भाजपचा बालेकिल्ला मानले जाते. राज्यात 27 वर्षांपासून भाजप सत्तेवर आहे. सलग सहाव्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने पूर्ण जोर लावला आहे. मागील निवडणुकीत 100 पेक्षा कमी जागांवर विजय मिळाल्याने भाजपसमोर यंदा आव्हान असणार आहे. भाजपने काही काळापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत पूर्ण मंत्रिमंडळ बदलले होते. भाजपविरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी अरविंद केजरीवाल आता जोरदार प्रचार करू पाहत आहेत.

Related Stories

घाऊक महागाई दर 10.49 टक्क्यांवर

Patil_p

भाजपचे 12 निलंबित आमदार सर्वोच्च न्यायालयात

Amit Kulkarni

पंजाब सरकारने महिला सशक्तीकरणाबाबत घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय

Rohan_P

म्युच्युअल फंडांच्या मालमत्तेत विक्रमी वाढ

Patil_p

हिंदू रक्षा दलाने स्वीकारली जबाबदारी

Patil_p

ऍनाकोंडा, शेषनागनंतर आता वासुकी धावली

Patil_p
error: Content is protected !!