ऑनलाईन टीम / मुंबई :
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे. आज दुपारी ही गोड बातमी खुद्द विराटने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.


विराटने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आम्हाला दोघांना सांगताना आनंद होत आहे, की आमच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे. तुम्ही दिलेले प्रेम आणि शुभेच्छांचे खूप आभार.’ अशा आशयाचे ट्विट विराटने केले आहे.
तसेच अनुष्का आणि चिमुकली दोघींचीही प्रकृती देखील स्थिर असल्याचे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे. 11 डिसेंबर 2017 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे.
विराटने ही आनंदाची बातमी सांगताच सोशल मीडियावर नेटकरी, चाहते व सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहेे. सायना नेहवाल, इरफान पठाण यांनीसुद्धा ट्विटरवर विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत.