Tarun Bharat

गुडे शिवोली येथील होमकुंडास 70 वर्षे पूर्ण

प्रतिनिधी /पणजी

पोर्तुगीजाविरुद्ध धर्मक्रांती उभारून गुडे शिवोली येथील ब्राह्मण देवस्थानासमोर 1952 साली जीवनमुक्त महाराज्यांनी पहिले होमकुंड गुढीपाढव्या दिवशी पेटवले त्याला यंदा 70 वर्षे पूर्ण होत असून यंदा गुडे शिवोली काळोबा देवस्थान परिसरात 2 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता होमकांड पेटणार आहे.

जीवनमुक्त महाराजांनी राष्ट्रधर्म जागरणाचा शंखनाद केला. त्यावेळी त्यांना गोविंद सिमेपुरूषकर यशवंत मडगांवकर, तुकाराम बिटये, विष्णू शिरोडकर यांच्यासारखे सहकारी लाभले. पोर्तुगिजानी उत्सवबंदी लादली होती ती धुडकावून गुडीपाडव्यादिवशी होमकुंड उत्सव घडवण्यात आले.

या उत्सवाला दर वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लोकांची गर्दी वाढत आहे त्यामुळे सदर उत्सव काळोबा मंडपाजवळ 1954 सालापासून सुरू आहे. मात्र ब्राह्मण देवस्थानाजवळ चंद्रज्योत पेटवून त्या ज्योतीनेच होमकुंड प्रज्वलित केले आहे.

पुजनीय मुकुंदराज महाराज, तुकराम शिरोडकर, डॉ. विनय मडगांवकर यांनी यथोचित ऐतिहासिक माहिती कथन केलेली चित्रफित प्रकाशित यावेळी केली जाणार आहे. गुढीपाडवा नववर्ष स्वागत करताना गोव्यातील मर्धक्रांतीचा हा प्रेरणादायी इतिहास सगळय़ांना कळावा म्हणून या ध्वनिचित्रफितीचे अनावरण होणार असल्याचे प्रा. विनय मडगावकर यांनी सांगितले.

Related Stories

पुत्राला आधार 78 वर्षीय कॅटरिना मायचा!

Amit Kulkarni

कलाकारांच्या मानधनात होणार वाढ

Amit Kulkarni

हायर सेकंडरीच्या परीक्षा आता ऑफलाईन

Amit Kulkarni

गोवा कोरोनामुक्तीसाठी लसीकरणात सहभागी व्हा

Amit Kulkarni

अल्प प्रतिसादात दहावी, बारावी वर्ग सुरू

Patil_p

राजीव नाईक यांचा नवदुर्गा हायस्कूलतर्फे गौरव

Amit Kulkarni
error: Content is protected !!