Tarun Bharat

गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी गर्दी

Advertisements

नागरिकांमध्ये उत्साह : पूजा साहित्यासह हार, फळे, श्रीखंड, बासुंदी खरेदीकडे ग्राहकांचा कल

प्रतिनिधी /बेळगाव

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. विशेषतः कोरोनाच्या प्रकोपाच्या दोन वर्षानंतर यंदा प्रथमच गुढीसाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. गुढी उभारण्यासाठी आवश्यक असणारे कलश, साखरेच्या माळा, फुलांच्या माळा खरेदीसाठी गर्दी वाढली होती. शनिवारी गुढीपाडवा असल्याने या सणासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदीसाठी बाजारात नागरिकांची लगबग दिसून आली.

बाजारात हार, फुले, फळे व इतर किराणा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली होती. याबरोबरच भाजी खरेदीदेखील झाली. गुढीपाडव्यामुळे शनिवारी बाजारात येता येणार नाही. त्यामुळे शुक्रवारीच काहींनी भाजी आणि इतर साहित्यांची खरेदी केली. गत दोन वर्षांत कोरोनामुळे पाडवा मर्यादित स्वरुपात झाला होता. मात्र यंदा पाडव्याच्या खरेदीला बाजारात उधाण आले होते. पारंपरिक गुढीपाडव्याच्या साहित्य खरेदीबरोबर हार, कडुलिंब, मिठाई, श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळी, शेंगापोळी, मांडे अशा पक्वानांनादेखील मागणी वाढली होती.

Related Stories

भेटवस्तूच्या आमिषाने तब्बल 88 लाखाचा गंडा

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात शनिवारी 239 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

Rohan_P

सदलगा येथे पंजाभेटी, पीर मिरवणूक रद्द

Amit Kulkarni

रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी करा

Omkar B

प्रधानमंत्री फसल योजनेसाठी 31 जुलैपर्यंत मुदत

Patil_p

अपघात प्रवण ठिकाणी रस्त्याचा विकास

Amit Kulkarni
error: Content is protected !!