Tarun Bharat

गुढीपाडव्याला मंदिराबाहेरूनच ‘दगडूशेठ गणपतीचे’ दर्शन

ऑनलाईन टीम / पुणे :

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे दरवर्षी गुढीपाडव्याला आकर्षक सजावट व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्याने नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी बाहेरूनच दर्शनाचा लाभ घेतला. मंदिरामध्ये गाभा-यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.     


दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. मंदिराचा यावर्षी ३८ वा वर्धापन दिन आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे यावर्षीचा संगीत महोत्सव व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.


ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने म्हणाले, चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला मंदिराला आकर्षक सजावट केली जाते. तसेच भाविकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळते. यंदा मंदिरा बाहेरूनच दर्शन असल्याने भाविकांची तुरळक गर्दी पाहायला मिळाली. संपूर्ण विश्वावरचे कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना विश्वस्तांनी गणरायाचरणी केली. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक कार्यक्रमदेखील पार पडले. तसेच पारंपरिक पध्दतीने गुढी उभारण्यात आली.    

Related Stories

लहरी पावसाची आबादानी

Patil_p

काश्मिरमध्ये भारतीय सैनिक करणार ‘दगडूशेठ’ ची प्रतिष्ठापना

Tousif Mujawar

मेहेंदी चित्रकलेतून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द

Archana Banage

‘राजा परांजपे करंडक दीर्घांक स्पर्धे’ची अंतिम फेरी १५ जानेवारीपासून

prashant_c

जुन्यातून डोकावू नावीन्याकडे…

Omkar B

रुपया घसरत नाहीय, तर लढतोय !

Patil_p
error: Content is protected !!