Tarun Bharat

गुढी पाडव्यासाठी बाजारपेठ सज्ज

प्रतिनिधी/ बेळगाव

भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जाणारा वर्षारंभाचा दिवस म्हणजे गुढीपाडवा होय. येत्या 13 एप्रिल रोजी गुढीपाडवा साजरा होणार आहे. अर्थात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्ती, श्रध्देने, उत्साहाने परंतु कोविड-19 नियमांचे पालन करून हो सण साजरा करावा लागणार आहे.

बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या साहित्याचे आगमन झाले आहे. यामध्ये गुढीला बांधल्या जाणाऱया साखरेच्या माळा, विविध गोड पदार्थ, गुढी, गुढीच्या काठय़ा हे साहित्य दाखल झाले आहे. त्याचबरोबर पंचाग ही विक्रीस उपलब्ध आहेत.

गुढी पाडवा म्हणजे हिंदू कॅलेंडरनुसार वर्षाचा पहिला दिवस तसेच साडेतीन मुहूर्ताचा दिवस गतवषी लॉकडाऊनमुळे या सणावर व खरेदीवर मर्यादा आल्या. यंदा मात्र व्यापाऱयांना, विपेत्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सराफी पेढय़ा सुद्धा सज्ज झाल्या आहेत.

गुढीसाठी लागणाऱया साखरेच्या गाठीमाळ, वीस रुपयांना उपलब्ध असून त्यामध्ये पांढरा, केशरी, गुलाबी व पिवळा या रंगसंगती आहेत. सर्व मिठाई दुकानांच्या प्रवेशद्वारावरच या माळा टांगलेल्या दिसत आहेत. बुरुड गल्लीमध्ये गुढीच्या काठय़ा मिळत आहेत. सणाला दोन दिवस असले तरी बेळगावमध्ये शनिवार हा बाजाराचा वार आणि रविवारची सुट्टी हे लक्षात घेत ग्रामीण भागातील नागरिकांनी शनिवारीच खरेदी उरकली. त्यामुळे कडुनिंब, आंब्याची पाने, फुले, अशी खरेदी त्यांनी पूर्ण केली.

त्याचबरोबर सराफीपेढय़ांमध्ये सोने दराची विचारणा सुरु असून एखादा दागिना घडविण्यासाठी दिला जात आहे. जेणेकरून पाडव्यापर्यंत तो मिळायला हवा. वस्त्रप्रावरणांच्या दुकानांमध्ये खरेदी सुरु आहे. याठिकाणी सवलत आणि गिफ्टचे आकर्षण आहे. बेळगावमध्ये अन्य शहरातून विविध कंपन्यांचे श्रीखंड, बासुंदी, असे पॅकबंद पदार्थ विक्रीसाठी आले आहेत. पंचाग बाजारात आले असून त्याची खरेदी सुद्धा सुरु झाली आहे.

Related Stories

…अन्यथा रुमेवाडी नाका महामार्गावर वृक्षारोपण

Omkar B

साई मंदिराच्या कमिटी नेमणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Omkar B

यल्लम्मा डोंगरावर करोडो रुपयांची उलाढाल

mithun mane

प्रिंट पॅक क्षेत्रातील अव्वल नाव ‘यारबल प्रिंट पॅक’

Amit Kulkarni

कोनवाळ गल्लीला दूषित पाणीपुरवठा

Amit Kulkarni

जिल्हय़ात जलजीवन मिशन प्रभावीपणे राबवा

Omkar B