Tarun Bharat

गुणरत्न सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवास्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक मोर्चा नेत तिथे आक्रमकपणे आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पलफेक देखील केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच खबळबळ उडाली घडामोडींना वेग आला व रात्री आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली. शिवाय अनेक आंदोलक कर्मचाऱ्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे.तर आज गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईत किला कोर्टात आणलं असता त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या घरावर आंदोलन घेऊन जाणाऱ्या १०७ आंदोलकांवर गावदेवी पोलीस ठाण्यात दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी २३ महिला आहेत. “अटकेच्या कोणत्याही प्रक्रियेचं पालन न करता मला अतिरेक्यासारखं पोलीस स्टेशनला आणलं. माझ्या जीवाला धोका आहे. दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात तक्रार केल्यामुळे माझा खून होऊ शकतो. माझ्या व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणली आहे,” असं गुणरत्न सदावर्ते पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काल म्हणाले होते. त्यांनतर सदावर्ते यांना मुंबईत किला कोर्टात हजर करण्यात आलं यावेळी न्यायालयाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

उदयनराजेंचा भाजपला घरचा आहेर

datta jadhav

शस्त्राचा धाक दाखवत नाडे येथे घरफोडय़ा

Patil_p

राज्य सरकारने जिल्हा बँकांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवली

Archana Banage

अकोल्यात कोरोनाचा पहिला बळी

prashant_c

सातारा : जिल्ह्यात ९१ जण कोरोनाबाधित ; एका बाधिताचा मृत्यू

Archana Banage

पुण्यातील चिखली येथील लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग

Archana Banage