Tarun Bharat

गुन्हेगारी टोळ्यांकडून मिथेनॉलयुक्त सॅनिटायझरची विक्री : CBI

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

संपूर्ण जग कोरोना संकटात सापडले असताना गुन्हेगारी  टोळ्यांकडून विषारी मिथेनॉलचा वापर करून हँड सॅनिटायझर विक्री केली जात आहे. तसेच पीपीई किट आणि इतर आवश्यक साधनांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी बनून गुन्हेगारी टोळ्यांनी लुट सुरू केली आहे. सीबीआयकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

कोरोना संकटात आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. इंटरपोलने सीबीआयला याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार सीबीआयने तातडीने पोलीस अधिकाऱ्यांना सावध केले आहे. 

गुन्हेगारी टोळ्यांकडून मिथेनॉलचा वापर करून बनावट हँड सॅनिटायझर तयार केले जात आहे. या टोळीचा दुसरा गट पीपीई किट आणि कोरोनाशी संबंधित साहित्य मेडिकलमध्ये पुरवत आहे. रुग्णालयांकडून साहित्याची ऑर्डर मिळाल्यानंतर साहित्य देत नाहीत. कमी वेळेत पैसे कमावण्यासाठी गुन्हेगार कोरोनाच्या या परिस्थितीचा फायदा घेत आहेत, असे सीबीआयकडून सांगण्यात आले.

Related Stories

कोल्हापूर विमानतळावर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात संपन्न

Abhijeet Khandekar

एअर इंडिया अन् एअरबस यांच्यात मोठा करार

Patil_p

मेहुल चोक्सीचे प्रत्यार्पण लांबणार

Patil_p

Lumpy Skin Disease : जयपूरमध्ये गेहलोत सरकारविरोधात भाजपची निदर्शने

Archana Banage

छत्तीसगडमध्ये 6 ऑगस्टपर्यंत वाढवले लॉक डाऊन

Tousif Mujawar

सिक्कीममध्ये भूस्खलन; 550 पर्यटक अडकले

datta jadhav