Tarun Bharat

गुन्हेगारी थोपविण्यासाठी पोलिसांना सहकार्याचे आवाहन

सीपीआय तुलसीगिरी यांची महाद्वार रोड येथील नागरिकांशी चर्चा

प्रतिनिधी /बेळगाव

पोलीस खात्याच्या जनसंपर्क कार्यक्रमांतर्गत मार्केट पोलीस ठाण्याचे सीपीआय मल्लिकार्जुन तुलसीगिरी यांनी आपल्या सहकाऱयांसह संभाजी गल्ली, महाद्वार रोड येथील नागरिकांच्या भेटी घेऊन चर्चा केली.

यावेळी त्यांनी या भागातील पंच कमिटी, महिला मंडळ, युवक मंडळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांशी गुन्हेगारीवर आळा घालण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील व परशराम कुरणे, बालकृष्ण चौगुले यांनी सीपीआय मल्लिकार्जुन तुलसीगिरी आणि सहकाऱयांचे स्वागत केले. यानंतर तुलसीगिरी यांनी पोलीस खात्याच्या जनसंपर्क कार्यक्रमाविषयी माहिती दिली आणि गुन्हेगारी थांबविण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कोठेही अत्याचार, गुन्हेगारी होत असल्यास जनतेने पोलिसांना कळविणे गरजेचे आहे. पोलीस आणि जनतेचं चांगलं नातं राहावं, अशी अपेक्षा व्यक्त करत सुदृढ समाज निर्मितीसाठी संभाजी गल्ली परिसरातील नागरिकांचे पोलिसांना नेहमीच सहकार्य असेल, असे आश्वासन दिले.

याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष परशराम कुरणे, पंच बाळकृष्ण चौगुले, विजय लगाडे, चंद्रकांत हंगिरगेकर, नारायण येळ्ळूरकर, रवी कोरे, नारायण मनोळकर, निंगाप्पा पाटील, हिंदुवादी संघटनेचे विशाल कणबरकर, यल्लाप्पा गुंजीकर, राजू हंगिरगेकर, मदन मणगुतकर यांसह अन्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Related Stories

हलगा-मच्छे बायपास खटल्याची सुनावणी सोमवारी होणार

Amit Kulkarni

कपिलेश्वर तलावाला कचराकुंडीचे स्वरूप

Amit Kulkarni

हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम

Amit Kulkarni

इस्कॉनतर्फे हरेकृष्ण रथयात्रेसाठी जय्यत तयारी

Rohit Salunke

रिकामी धावतेय बेंगळूर-बेळगाव एक्स्प्रेस

Patil_p

आनंदवाडी रोडशेजारील साईडपट्टय़ांचे काम रखडले

Amit Kulkarni