Tarun Bharat

गुन्हे दाखल झाल्यास पर्वा नाही

तो स्टॉल लावण्यास परवानगी द्या : सोमवारी मुख्याधिकाऱयांना भेटणार : शिवसेना तालुकाप्रमुख राऊळ यांची माहिती

सावंतवाडी:

शहरातील जनतेच्या हितासाठी व न्यायासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी वेळ आल्यास गुन्हे दाखल करून घेण्यास केव्हाही तयार आहेत. नगराध्यक्ष संजू परब यांनी दिलेल्या धमकीला आम्ही घाबरत नाही. संत गाडगेबाबा मंडईतील काढण्यात आलेल्या स्टॉलचालकाला न्याय मिळवून देणार आहोत. येत्या सोमवारी मुख्याधिकाऱयांची भेट घेऊन सदर स्टॉल ज्या कर्मचाऱयांनी हटविला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीचे पदाधिकारी अशोक पवार, प्रशांत कोठावळे, भारती मोरे, शब्बीर मणियार, अपर्णा कोठावळे, ऍड. नीता सावंत-कविटकर, चित्रा बाबर-देसाई, अजित सांगेलकर, रवी जाधव आदी उपस्थित होते.

नगरपालिका कर्मचाऱयांनी मुख्याधिकाऱयांचे कोणतेही आदेश नसताना कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर रात्रीच्या वेळी संत गाडगेबाबा मंडईतील रवी जाधव यांच्या स्टॉलवर एकतर्फी कारवाई केली होती. या प्रकरणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, व्यापारी व नागरिकांनी रवी जाधव यांना न्याय मिळावा, यासाठी नगरपालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्याधिकारी शासकीय कामानिमित्त बाहेर गेल्याने ते दुपारपर्यंत चर्चेस न आल्याने आंदोलनकर्त्या पदाधिकाऱयांनी हटविण्यात आलेला जाधव यांचा स्टॉल पूर्ववत उभारला. बेरोजगार युवकाला रोजगार मिळाला होता. जाधव यांना सत्तेतील एका नगरसेवकाने धमकी दिली, ही बाब दुर्दैवी आहे. नगराध्यक्ष संजू परब यांचे हे नगरसेवक नसून बकासूर आहेत, असा आरोपही राऊळ यांनी केला. ते पक्षासाठी व नागरिकांसाठी घातक ठरणार आहेत. जाधव यांचा हटविण्यात आलेला स्टॉल पूर्ववत लावण्यास परवानगी देऊन जप्त केलेला माल परत करावा, अशी आमची मागणी आहे.

                     चांगले काम करा, पाठिंबा देऊ!

मुख्याधिकारी व नगराध्यक्ष परब यांचा समन्वय नाही, ही दुर्दैवी बाब आहे. मुख्याधिकाऱयांचा आदेश जर नगराध्यक्ष पाळत नसतील, तर ते काय न्याय देणार आहेत? सावंतवाडी शहर सुसंस्कृत व शांत आहे. त्या पद्धतीने परब यांनी चांगले काम करावे. आमचा त्यांना पाठिंबा राहील. या स्टॉलचा प्रश्न नगराध्यक्षांनी स्टॉल चालक व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱयांची एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढला असता, तर सुटला असता. मात्र, तसे केले नाही. जर त्यांची भूमिका स्टॉलचालकाच्या विरोधात असेल तर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून न्याय दिला जाणार असल्याचे राऊळ म्हणाले.

                         नगरसेवकाने धमकी दिली!

यावेळी रवी जाधव म्हणाले, बेरोजगार असल्याने सणाच्या कालावधीत नगरपालिकेची परवानगी घेऊन स्टॉल लावतो. नगरसेवक नासीर शेख यांनी आपल्याला स्टॉल लावायचा नाही व पुन्हा लावू देणार नाही, अशी धमकी दिली होती. नगरसेवक शेख हे आपल्या वॉर्डातून निवडून आले. त्यांच्याकडून न्याय मिळण्याची अपेक्षा होती. रोजगार नसल्याने आर्थिक संकट आले आहे. उदरनिर्वाहासाठी अन्य पर्याय नसल्याने पुन्हा स्टॉल लावण्यास संधी प्रशासनाने द्यावी.

Related Stories

राष्ट्रीय कुटुंब अनुदान योजनेमधील दारीद्रय रेषेखालीची अट रद्द करावी

NIKHIL_N

आडवली रेल्वे ट्रकवर दरड कोसळली

Patil_p

सिंधुदुर्गात दुर्मीळ ‘देव जांभुळ’ वनस्पतीचे अस्तित्व

NIKHIL_N

कणकवलीत वादावादीतून युवकावर चाकूहल्ला

Anuja Kudatarkar

महिला ग्रा पं. सदस्यांना धक्कबुक्की व शिवीगाळ

Patil_p

रत्नागिरीत दुकाने फोडणाऱया दोघा संशयितांना अटक

Patil_p