Tarun Bharat

गुप्त माहिती मिळविण्यासंदर्भात पोलिसांनी गिरवले धडे

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील पोलीस व अधिकाऱ्यांना शनिवारी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. आरटीओ सर्कलजवळील पोलीस जिमखाना येथे झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात निवृत्त अधिकाऱ्यांकडून गुप्त माहिती काढण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

राज्य गुप्तचर विभागाचे निवृत्त पोलीस उपअधीक्षक नारायण स्वामी यांनी शहरातील निवडक अधिकारी व पोलिसांना यासंबंधी प्रशिक्षण दिले. यावेळी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे उपस्थित होते.

पोलिसांच्या कामात गुप्त माहिती मिळविण्याला महत्त्व आहे. त्यासाठी स्वतंत्र विभागही आहे. सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार गुप्त माहिती कशी काढायची, याविषयी नारायण स्वामी यांनी मार्गदर्शन केले. नारायण स्वामी यांनी गुप्तचर विभागात अत्यंत प्रभावीपणे सेवा बजावली आहे.

Related Stories

काळी आमराईत जीवनावश्यक साहित्याचे वाटप

Patil_p

जिल्ह्यात 1348 अंगणवाड्या भाडेतत्त्वावर

Amit Kulkarni

सदाशिवनगर येथे कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

Patil_p

रस्त्यावरील विद्युतखांब हटविण्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

समादेवी मंदिरातील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

Amit Kulkarni

समर्थनगर येथे बसविला नवीन ट्रान्स्फॉर्मर

Amit Kulkarni