Tarun Bharat

गुरमीत राम रहीमची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल; उपचारानंतर पुन्हा जेलमध्ये रवानगी

ऑनलाईन टीम / रोहतक : 


बलात्कार प्रकरणातील दोषी आणि डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याची तब्येत पुन्हा एकदा बिघडली असून त्याला रोहतकच्या पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, राम रहीमच्या पोटात दुखू लागल्यानंतर त्याला तुरुंगातून रुग्णालयात हलवण्यात आले. गुरुवारी सकाळी जवळपास 7 वाजल्याच्या सुमारास राम रहीम याला कडक सुरक्षेत रोहतकमध्ये आणण्यात आले. त्यानंतर एन्डोस्कोपी आणि अन्य तपासणी केल्यानंतर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात त्याला औषधे देण्यात आली आणि तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. अजून तपासणीचे रिपोर्ट मिळणे बाकी आहे. 


दरम्यान, यापूर्वी 12 मे रोजी देखील रक्तदाबाची समस्या जाणवत असल्याने त्याला पीजीआयमध्ये नेण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वीच आई नसीब कौर या आजारी अडल्याने त्यांना गुरुग्रामला जाऊन  भेटण्यासाठी राम रहीमने 21 दिवसांचा पॅरोल मागितला होता. परंतु, त्याला केवळ 48 तासांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता.


53 वर्षीय राम रहीम याला आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत बलात्कार प्रकरणात पंचकूला स्थित सीबाआय विशेष न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. तो 2017 पासून रोहतकच्या तुरुंगात बंद आहे.

Related Stories

PM मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक; बिटकॉईन संदर्भात ट्विट करत उडवली खळबळ

datta jadhav

यूपीएससी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य

datta jadhav

सात चिमुकल्यांसह 14 वऱ्हाडी ठार

Patil_p

शाहरुख खानने आर्थर रोड तुरुंगात जाऊन घेतली आर्यनची भेट

Archana Banage

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक

Archana Banage

हिंदू भारतविरोधी असू शकत नाही!

Patil_p
error: Content is protected !!