Tarun Bharat

गुरुग्राममध्ये घरातून स्फोटके जप्त

गुरुग्राम / वृत्तसंस्था

हरियाणातील गुरुग्राम शहरामधील एका घरातून पोलिसांनी दोन हातबाँब, 15 सराव बाँब, दीर्घ पल्ल्याची 43 रिकामी काडतुसे आणि इतर स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली आहे. मंगळवारी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ही स्फोटके हस्तगत करण्यात आली. या घरातून ही स्फोटके जप्त करण्यात आली, ते रिकामे होते. ते एका सीएनजी विक्री केंद्राच्या जवळ होते. या स्फोटकांचा स्फोट झाला असता तर सीएनजी विक्री केंद्राचा भडका उडून मोठय़ा प्रमाणात जीवीत आणि वित्तहानी होण्याची शक्यता होती. एक हातबाँब तज्ञांच्या साहाय्याने निकामी करण्यात आला. या स्फोटकांची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Related Stories

पतंप्रधान नव्हे भाडय़ाचे गुंड परप्रांतीय

Patil_p

5 हजारांची तारणहार कमल कुंभार

Patil_p

गुजरातमध्ये लवकरच सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय

Patil_p

कृष्णाच्या गंगेचा रंग बदलतोय

Patil_p

गोग्रा, डेपसांगमधील सैन्यवापसीवर भारत-चीनमध्ये चर्चा

datta jadhav

सर्वोच्च न्यायालयाचा ईडीला दंड

Patil_p
error: Content is protected !!