Tarun Bharat

गुरुजींची शाळा बंद सर्व्हे सुरू

सभापती निवासस्थानी शिक्षक संघटनांनी केली गर्दी

प्रतिनिधी/ सातारा

कोरोना काळात प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना आखते आहे. त्यातील एक म्हणजेच ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ हा उपक्रम आहे. या अंतर्गत सर्व्हे करण्यासाठी काही ठिकाणी शिक्षकांना आता तोंडी व लेखी आदेश दिले आहेत. त्यामुळे शाळा बंद आणि सर्व्हे सुरू झाला आहे. त्यास विरोध म्हणून सोमवारी शिक्षक संघटनांनी सभापती यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी बैठकीचे आश्वासन देण्यात आले  होते, मात्र ती झाली नसल्याने  उस्त्रा होण्याची शक्यता आहे. आम्ही सर्व्हे करणार नसल्याची भूमिका शिक्षकांनी घेतली आहे, तर सर्व्हेला नेमलेल्या कर्मचाऱयांना कोणतीही सोयी सुविधा दिल्या नसल्याचे दिसून येत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व वाढत चाललेला कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाचा त्रास होतो आहे, का लक्षणे जाणवत आहेत का?, याची माहिती असण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या उपक्रमामध्ये सर्व्हे सुरू केला आहे. तालुका तालुका पातळीवर सर्व्हे करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी दिले आहेत. त्यानुसार सर्व्हे सुरू झाला असून त्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. शिक्षकांच्यावर आलेली जबाबदारी काहींनी निभावत कामाला सुरुवात केली तर काही शिक्षकांनी एकत्र येऊन संघटनाकडे गेले. आज संघटनांनी सभापती सरिता इंदलकर यांना त्यांच्या निवासस्थानी गाठले. त्यांच्या निवासस्थाना बाहेर शिक्षकांनी गर्दी केली होती. त्यांनी दुपारी बैठकीचे आश्वासन दिले मात्र ती बैठक झाली नसून आज होण्याची शक्यता आहे. तर सर्व्हेला असणाऱया काही ठिकाणी कर्मचाऱयांना सुरक्षा म्हणून काहीच दिले जात नाही. केवळ ऑक्सिमिटर, टेमरेचर गन दिली आहे. त्यामुळे शिक्षक कोरोना बाधित झाले तर यांची जबाबदारी कोण घेणार असे एक नाही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

शिक्षक का झाले एक

सध्या शिक्षक बँकेची निवडणूक कधीही लागू शकते. त्या निवडणुकीत आपल्या संघटनेचे काही तरी काम दिसले पाहिजे म्हणून सर्व शिक्षक संघटनामध्ये चढाओढ सुरू आहे.

Related Stories

अँड.पंडितराव सडोलीकर यांचे निधन

Archana Banage

फडणवीसांना ‘मुंबई मॉडेल’ पचत नसल्यानेच पसरवताहेत खोटी माहिती; नवाब मलिकांची टीका

Archana Banage

भुईंज येथे अनोळखी व्यक्तीचा गळा दाबून खून

datta jadhav

सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग नव्हेच हा तर पाणंद रस्ता

Archana Banage

मारहाणप्रकरणी निंबोडीच्या सरपंचासह ६ जणांवर गुन्हा

datta jadhav

अख्ख्या गल्लीची चाळण करुनही लिकेज सापडेना!

Archana Banage