Tarun Bharat

गुरुनाथ कटारे खून प्रकरणी तीन जणांना जन्मठेप

Advertisements

प्रतिनिधी / सोलापूर

राजकीय वैमनस्यातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ जगदेवप्पा कटारे (वय 55) यांचा तलवारीसह धारदार हत्याराने हल्ला करुन खून केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. आर. देशपांडे यांनी तीन आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी 2 हजार रुपये दंड अशी शिक्षा शुक्रवारी सुनावली. या गुह्यातील मुख्य सूत्रधार अद्याप फरारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रमोद उर्फ किंगभाई प्रकाश स्वामी (वय 29, रा. रामवाडी, सोलापूर), जगदीश उर्फ पिंटू रत्नाकर कोन्हेरीकर (वय 29, रा. उत्तर कसबा, मसरे गल्ली, सोलापूर) व प्रदीप उर्फ दिपक उर्फ दिपू प्रभाकर मठपती (वय 24, रा. महालक्ष्मी सोसायटी, शेळगी, सोलापूर) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुरुनाथ कटारे हे तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करीत होते. 13 ऑक्टोबर 2014 रोजी रात्री घरकुल चौकातील चहा पॅन्टीन येथून त्यांच्याकडील ऍक्टीवा दुचाकीवरुन कटारे शिवलिंग पारशेट्टी यांच्यासह निघाले. तसेच नबीलाल नदाफ हे कटारे यांची बुलेट गाडी घेऊन त्यांच्या पाठीमागून निघाले. माचर्ला मिलजवळील कच्च्या रस्त्यावरुन जात असताना, अचानक समोर तीनजण तलवार घेऊन आले. त्यांनी चेहऱयावर कापड बांधलेले होते. ते हल्ला करण्यासाठी धावून आले, तेव्हा बचाव करीत असताना, दुचाकी घसरुन दोघेही खाली पडले. त्यानंतर पारशेट्टी हे अंधाराचा फायदा घेऊन पळण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी तलवारी घेऊन आलेल्या आरोपींनी गुरुनाथ कटारे व नबीलाल नदाफ यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कटारे यांना त्यांच्या मुलाने तसेच पत्नी व इतरांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले कटारे हे मृत्यू पावले तर नदाफ यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याचा तपास तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय (सध्या, पोलीस अधिक्षक परभणी), शितल राऊत (गुन्हे अन्वेषण भरारी पथक, पुणे), जितेंद्र कदम (गुन्हे अन्वेषण भरारी पथक, पुणे) व महादेव बिराजदार (गुन्हे अन्वेषण भरारी पथक, सोलापूर) तसेच ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन कौसडीकर यांनी केला.

या गुह्याचा तपास करुन गुन्हे अन्वेषण भरारी पथकाने आरोपींविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे 18 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपींनी घातक शस्त्रांनी कटारे यांचा खून केला. साक्षीदार गोवर्धन व प्रविण स्वामी यांचे मोबाईल लोकेशन घटनास्थळी आढळले. त्याचबरोबर आरोपी प्रदीप मठपती याने न्यायालयात दिलेला जबाब ग्राह्य धरण्याबाबत विविध न्यायालयाचे न्यायनिवाडे दिले. तसेच सरकारने केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे ऍड. प्रकाश जन्नू, ऍड. आनंद कुर्डूकर, ऍड. शैलेजा क्यातम तर आरोपीतर्फे ऍड. रजाक शेख व ऍड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले. वळसंग पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी शितल साळवे यांनी कोर्ट पैरवी म्हणून मदत केली.

घटनाक्रम

13 ऑक्टोबर 2014 रोजी रात्री घटना घडली.

18 नोव्हेंबर 2017 सुनावणीस प्रारंभ

8 नोव्हेंबर 2019 रोजी सरकार पक्षाचा युक्तीवाद

22 नोव्हेंबर 2019 रोजी आरोपीचा युक्तीवाद

10 मार्च 2015 रोजी 500 पानांचे दोषारोपपत्र दाखल

31 जानेवारी 2020 रोजी खटल्याचा निकाल

Related Stories

नागपाडा येथे इमारतीला आग; 5 जखमी

prashant_c

आघाडी सरकार न हालणारे, न डोलणारे फक्त हप्ते वसुल करणारे – देवेंद्र फडणवीस

Sumit Tambekar

सोलापुरात आज 5 कोरोना पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

सोलापूर : डॉ. अश्विनी वाकडे यांची यशाला गवसणी

Abhijeet Shinde

सोलापूर : बार्शीचे आ. राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

Abhijeet Shinde

…कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे

prashant_c
error: Content is protected !!