Tarun Bharat

गुरुप्रसाद कॉलनीत फ्लॅटमध्ये चोरी

पाच लाखाची रोकड लांबवली

प्रतिनिधी /बेळगाव

गुरुप्रसाद कॉलनी, मंडोळी रोड येथील एका फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे. रविवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून चोरटय़ांनी तिजोरीतील पाच लाख रुपये पळविल्याचे उघडकीस आले आहे.

पवनकुमार जैन यांचा फ्लॅट फोडण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी पंचनामा केला. पवनकुमार हे कामानिमित्त पुण्याला गेले आहेत. ते आल्यानंतर घरातील नेमके काय चोरीला गेले आहे? याचा उलगडा होणार आहे.

पवनकुमार व त्यांचे कुटुंबीय शनिवारी सकाळी फ्लॅटला कुलूप लावून पुण्याला गेले आहेत. रविवारी सकाळी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा होता. कडीकोयंडा तोडण्यात आला होता. त्यामुळे चोरीचा प्रकार उघडकीस आला. मोलकरणीने ही घटना पाहिली. त्यांच्या बेळगाव येथील नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. ते पुण्याहून परतल्यानंतरच यासंबंधी अधिक माहिती मिळणार आहे.

Related Stories

काहेरतर्फे पर्यावरण दिन साजरा

Amit Kulkarni

शहरातील रस्ते पार्किंग-फेरीवाल्यांच्या विळख्यात

Amit Kulkarni

सामाजिक वनीकरणातर्फे रोपांना पाणीपुरवठा

Omkar B

खानापूर येथे दुर्गादौडीची सांगता

Amit Kulkarni

पूर्वभागात धूळवाफ पेरण्या पूर्णत्वाकडे

Amit Kulkarni

गुरूवारी जिह्यात कोरोनाचे दहा रुग्ण

Amit Kulkarni