Tarun Bharat

गुरुवारी कोरोनाचे 966 नवे रुग्ण

Advertisements

 प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव जिल्हय़ात सक्रिय रुग्णांची संख्या घटत आहे. गुरुवारी सायंकाळी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप 12 हजार 287 सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी लक्षणे नसणाऱयांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. 15 दिवसांपूर्वी सक्रिय रुग्ण संख्येने 19 हजारांचा टप्पा ओलांडला होता. गुरुवारी जिल्हय़ात 966 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

गेल्या 24 तासांमध्ये 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. बैलहोंगल, बेळगाव, चिकोडी तालुक्मयातील प्रत्येकी एक, गोकाक तालुक्मयातील चार व हुक्केरी तालुक्मयात तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. 10 जणांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत कोरानाने 597 जण दगावले आहेत. गुरुवारी बेळगाव तालुक्मयातील 352 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत बाधितांचा आकडा 68,621 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 393 जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्हय़ातील 55 हजार 737 जण बरे झाले आहेत. 12 हजार 287 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लक्षणे असणाऱयांवर सरकारी व खासगी इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

अद्याप 2 हजार 295 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत 8 लाख 23 हजार 214 जणांची स्वॅब तपासणी झाली आहे. यापैकी 7 लाख 48 हजार 165 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. बेळगाव पाठोपाठ चिकोडी, बैलहोंगल, हुक्केरी, रायबाग, रामदुर्ग तालुक्मयातही रुग्णसंख्या वाढती आहे. त्यामुळेच प्रशासनाने शुक्रवारी सकाळपासूनच तीन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन जारी केला आहे.

यरमाळ, बंबरगा, सांबरा, कंग्राळी बी.के., हिरेबागेवाडी, रंगदोळी, के. के. कोप्प, बेळगुंदी, बडाल अंकलगी, कावळेवाडी, बसुर्ते, मण्णिकेरी, बस्तवाड, नंदिहळ्ळी, के. के. कोप्प, हलगा, हंदिगनूर, बिजगर्णी, अष्टे-चंदगड, मुचंडी, होनगा, काकती, बाळेकुंद्री के. एच., कलखांब, गणेशपूर, मच्छे, अतिवाड, काकती, मुतगा, निलजी, पंतनगर, अगसगा, पिरनवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

रामतीर्थनगर, गोवावेस, अंजनेयनगर, भाग्यनगर, श्रीनगर, कणबर्गी, टिळकवाडी, महांतेशनगर, काळी आमराई, वडगाव, खासबाग, कोनवाळ गल्ली, नानावाडी, माळमारुती, मंडोळी रोड, टिळकवाडी, शहापूर, नेहरुनगर, न्यू गुड्सशेड रोड, सदाशिवनगर, पार्वतीनगर-उद्यमबाग, सह्याद्रीनगर, समर्थनगर, संभाजीनगर-वडगाव, संगमेश्वरनगर, आझमनगर, उद्यमबाग, मार्केटयार्ड, बसवणकुडची, कॅम्प, कुमारस्वामी लेआऊट, हनुमाननगर, शिवबसवनगर, विश्वेश्वरय्यानगर, अनगोळ, मजगाव, शिवाजीनगर, बसव कॉलनी, येळ्ळूर, यमनापूर, वैभवनगर परिसरातही नवे रुग्ण आढळून आले आहेत.

कापड दुकानदारावर गुन्हा

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱया किर्लोस्कर रोडवरील चिपर्स स्पॉट या कापड दुकानदारावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विनायक मोरजकर, सिद्धेश मोरजकर, विनायक जगताप या तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी सांगितले. गुरुवारी अनावश्यकपणे रस्त्यावरुन फिरणारी 35 वाहने जप्त करण्यात आली असून विनामास्क फिरणाऱया 279 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Related Stories

तरुणाच्या अवयवदानामुळे चौघा जणांना जीवदान

Omkar B

निपाणीत दुचाकी चोरटय़ास अटक

Amit Kulkarni

‘ज्ञान प्रबोधन’मध्ये अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन

Patil_p

आता रात्री 10 ते पहाटे 5 नाईट कर्फ्यू

Amit Kulkarni

मधुकर सापळेला न्यायालयीन कोठडी

Patil_p

निजदच्या चंद्रशेखर लोणी यांचे कडवे आव्हान

Omkar B
error: Content is protected !!