Tarun Bharat

गुरूवारी कोरोना रुग्ण संख्येने पार केला 800 चा आकडा

Advertisements

सक्रिय रुग्ण संख्या 3 हजारांच्या उंबरठय़ावर, बाधितांची संख्या वाढतीच

 प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव जिह्यात गुरूवारी कोरोना रुग्ण संख्येने 800 चा आकडा पार केला. गेल्या 24 तासांत 816 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 282 जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 156 जणांना घरी पाठविण्यात आले आहे.

सक्रिय रुग्ण संख्याही वाढती आहे. जिह्यात 2 हजार 822 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांत उपचार करण्यात येत आहेत. जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 31 हजार 89 इतकी झाली असून अद्याप 10 हजार 700 हून अधिक जणांची स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे.

आतापर्यंत 28 हजार 799 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 360 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे. 6 लाख 85 हजार 174 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून यापैकी 6 लाख 38 हजार 848 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 57 हजार 754 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.

बस्तवाड, आंबेवाडी, मच्छे, वाघवडे, कुकडोळी, गणेशपूर, हिंडलगा, कणबर्गी, काकती, कंग्राळी बी. के., कंग्राळी के. एच. कर्ले, करडीगुद्दी, होनगा, देसूर, मुतगा,  पिरनवाडी, काकती, मारिहाळ, संतीबस्तवाड, येळ्ळूर, महांतेशनगर, शिवाजीनगर, श्रीनगर, वडगाव, अनगोळ, अशोकनगर, अजमनगर, अंजनेयनकर, बसवणकुडची, चव्हाट गल्ली, रामतीर्थनगर, शाहूनगर, भाग्यनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून बिम्स्मधील 10 विद्यार्थी व कर्मचाऱयांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

कॅम्प, राणी चन्नम्मानगर, चिदंबरनगर, चौगुलेवाडी, क्लब रोड, गांधीनगर, हनुमाननगर, गुडस्शेड रोड, रुक्मिणीनगर, मार्केटयार्ड, खासबाग, जेएनएमसी कॅम्पस, कडोलकर गल्ली, खडेबाजार, कोल्हापूर सर्कल, कुमारस्वामी लेआऊट, महांतेशनगर, टिळकवाडी, सदाशिवनगर, शाहूनगर, शास्त्राrनगर, सुभाषनगर, वैभवनगर, विरभद्रनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

Related Stories

माजी आमदार सुरेश पाटील यांचे निधन

Omkar B

जाधवनगरात बिबटय़ाची दहशत

Amit Kulkarni

चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला

Patil_p

इनरव्हील क्लबतर्फे ब्लँकेट्सचे वितरण

Amit Kulkarni

कित्तूरचे तहसीलदार लोकायुक्तांच्या जाळय़ात

Amit Kulkarni

तुरमुरी ग्रा. पं. अध्यक्षपदी वैशाली खांडेकर यांची निवड

Amit Kulkarni
error: Content is protected !!