Tarun Bharat

गुरूवारी जिह्यात कोरोनाचे दहा रुग्ण

सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट

प्रतिनिधी / बेळगाव

गुरूवारी बेळगाव शहर व जिह्यातील आणखी दहा जणांचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील चौघा जणांचा समावेश असून जिह्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिह्यात केवळ 139 सक्रिय रुग्ण आहेत. गुरूवारी शहापूर, मुतगा, मजलट्टी, महांतेशनगर, कोगनोळी, निपाणी, काडापूर, हारुगेरी, रामदुर्ग परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यामध्ये एका शिक्षकाचा समावेश आहे.

जिह्यातील एकूण बाधितांची संख्या 26 हजार 460 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 25 हजार 977 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी पुण्याहून कोरोनावरील लस बेळगावात दाखल झाली आहे. गुरूवारी जिह्यातील इतर तालुक्मयांना लस पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती. शनिवार दि. 16 जानेवारी रोजी लसीकरणाला सुरूवात होणार आहे. डॉक्टर, परिचारीका, आरोग्य कर्मचारी, आशा कार्मचाऱयांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव जिह्यातील 12 ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related Stories

अनेक शर्यती गाजविणारा किणयेतील ‘बबल्या’ बैल हरपला

Amit Kulkarni

बसवन कुडचीत आज मूर्तीप्रतिष्ठापना

Amit Kulkarni

तालुक्यातील जमीन बळकावणाऱया बुडाला नोटीस

Patil_p

आनंद घेण्यासाठी कला हवी ज्येष्ठ चित्रकार काशिनाथ हिरेमठ यांचे मत

mithun mane

फुलबाग गल्ली येथे रस्त्याची दुरवस्था

Amit Kulkarni

शनिवारी 2 हजार रुग्ण कोरोनामुक्त

Patil_p