Tarun Bharat

गुहागर आगारातच बस पंक्चर, वाहतूक कोंडीत भर

वार्ताहर/ गुहागर

गुहागर एसटी बसस्थानकातून बाहेर पडलेली बस आगाराच्या प्रवेशद्वाराजवळच पंक्चर झाल्याने आगाराच्या देखभाल दुरुस्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  गुहागर आगाराच्या बसेस पंक्चर होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.  बसेसची कार्यशाळेत देखभाल दुरुस्ती, तपासणी केली जाते का नाही, यावरच अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. गुहागर आगाराची गुहागर-चिपळूण ही बस सकाळी 11 च्या सुमारास बसस्थानकातून सुटली व प्रवेशद्वारातून बाहेर पडताक्षणीच टायरचा आवाज आला. 

  बसस्थानकासमोरच श्रीदेव व्याडेश्वर मंदिराजवळ अरुंद रस्त्यामुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होते. या अरुंद रस्त्यावरच बस पंक्चर झाल्याने सुमारे 1 तास प्रवाशांसह अनेक वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागले. आगाराच्या कार्यशाळेतील कर्मचाऱयांनी बसचा टायर बदलून वाहतूक पूर्ववत केली.

Related Stories

तळाशील कवडा रॉकजवळ पर्ससीन ट्रॉलर्सचा धुमाकूळ

Anuja Kudatarkar

आठ सर्पमित्रांची ‘रियल हिरो अवॉर्ड २०२२’ साठी निवड

Anuja Kudatarkar

उत्तम काम करणाऱ्या कृती दलांचा होणार ‘कोरोना लढा सन्मान’ ने गौरव

Archana Banage

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने लोवले शाळेच्या वादग्रस्त नामफलकावर पडदा

Archana Banage

रत्नागिरीत कामगारांचे सरकार जगावो आंदोलन

Patil_p

जिल्हा कोविड रुग्णालयाला ‘मिशन आधार’चा आधार

NIKHIL_N