Tarun Bharat

”गुहागर विजापूर, आणि मनमाड चिकोडी राष्ट्रीय महामार्गगतीने पूर्ण करा”

Advertisements

सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकर यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी / सांगली

सांगली जिल्ह्यातून जात असलेल्या गुहागर विजापूर आणि मनमाड चिकोडी या दोन राष्ट्रीय महामार्ग बाबत सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या गुहागर ते विजापूर आणि मनमाड ते चिकोडी या राष्ट्रीय महामार्गांचे काम लवकरात लवकर पूर्ण करणेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच सांगली जिल्ह्यातील नवीन रस्त्यांचे प्रस्ताव, दोन्ही राष्ट्रीय महामार्गांच्या जंक्शन पॉईंटवर येणाऱ्या तासगांव शहरातील रिंग रोडसंदर्भात सविस्तर चर्चाही केली. याबद्दल केलेल्या मागण्यांना गडकरी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

यावेळी तासगांव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक . बाबासाहेब पाटील, तासगांव कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक . आर. डी. पाटील हेही उपस्थित होते.

Related Stories

बेपत्ता परमबीर सिंह चंदीगढमध्ये?

Archana Banage

कडेगावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संशयित आरोपी ताब्यात

Archana Banage

‘पंकजा मुंडेंना मोठी जबाबदारी मिळेल’; गिरीश महाजनांचं वक्तव्य, खडसेंना प्रत्युत्तर

Archana Banage

”सरकारला आत्मचिंतन करण्याची वेळ”

Archana Banage

कोल्हापूर : आता शेतकर्‍यांना मिळणार बांधावरच धडे

Archana Banage

सांगली जिल्हा परिषदमध्ये ६० जागांसाठी निवडणूक

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!